शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
3
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
4
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
5
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
6
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
7
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
8
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
12
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
13
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
14
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
15
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
16
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
17
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
18
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
19
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
20
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी, पुंडलिकनगरात पुन्हा गुंडगिरी डोईजड; लुटमारीसाठी हत्येच्या प्रयत्नाची दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 18:23 IST

पुंडलिकनगरमध्ये तरुणाचा पाठलाग करून चाकू खुपसला; आदल्या दिवशी दुकानदाराकडून ४ हजार घेतले, तक्रार नसल्याने आत्मविश्वास वाढला

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी, पुंडलिकनगर ठाण्याच्या हद्दीत पुन्हा गुन्हेगारांनी डोकेवर काढले असून, रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी हल्ला करण्याची पाच दिवसांतच दुसरी घटना घडली. तीन जणांच्या टोळक्याने पोशट्टी गंगाधर डुबकवाड (४०, रा. मुकुंदवाडी) यांच्या पोटात दोन वेळा चाकू खुपसून हत्येचा प्रयत्न केला. २३ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या घटनेप्रकरणी २४ नोव्हेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला.

जयभवानीनगरात राहणारे पोशट्टी २३ नोव्हेंबरला कामानिमित्त मुकुंदवाडी रेल्वे स्थानक परिसरात गेले होते. ८ वाजेच्या सुमारास ते तेथीलच दारूच्या अड्ड्याजवळ उभे असताना, दोन अज्ञातांनी त्यांना खाली पाडले. तेवढ्यात दुसऱ्याने त्यांच्या खिशातील मोबाइल हिसकावून पोबारा केला. स्वत:ला सावरून पोशट्टी घरी गेले. मोबाइलचे बिल घेऊन ते मुकुंदवाडी ठाण्यात जाण्यासाठी निघाले. तेवढ्यात गल्ली क्रमांक ९ मध्ये पुन्हा तिघांनी त्यांना अडवले. पायात पाय अडकवून जमिनीवर पाडत मारहाण केली. त्यांचे खिसे चाचपूण पैशांची मागणी करून मोठमोठ्याने आरडाओरड केली. मात्र, त्यांच्या खिशात काहीच मिळून न आल्याने त्यांना बेदम मारहाण करून एकाने थेट त्यांच्या पोटात चाकू खुपसला. यात रक्तबंबाळ होऊन पोशट्टी बेशुद्ध झाले.

एक रेकॉर्डवरील गुन्हेगारसंबंधित लुटमार व हल्ला मुकुंदवाडीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आर्यन दाणे याच्यासह अतुल मुऱ्हाडे, कार्तिक बामणे या टवाळखोरांनी केल्याचे समोर आले. त्यांच्यावर मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी गुरुवारीच ‘मोक्का’त जामिनावर बाहेर असलेल्या संकेत किशोर लामदांडे (२२, मुकुंदवाडी गाव) याने एका तरुणाचा पाठलाग करत चाकूने सपासप वार केले होते.

लुटमार, गुंडगिरी सातत्याने, पोलिस करताहेत काय ?रविवारी याच परिसरात एका गुंडांच्या टोळीने एका किराणा दुकाना व्यवसायिकाला धमकावून चार हजार हिसकावून नेले. मात्र, या गुंडांच्या भीतीमुळे त्याने तक्रार केली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. दहा दिवसांपूर्वी शिवाजीनगरवरून राजनगर मार्गे घरी परतत असलेल्या एका दुचाकीस्वाराला अपघाताचे कारण करून गुुंडांनी घेऊन धारदार काेयते बाहेर काढले. त्याला जिवे मारण्याची धमकी देत जागीच पैसे उकळले. मुकुंदवाडी, रामगनर, राजनगर परिसरात ही गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत असून, शिवाजीनगर, रेल्वे स्थानक, राजनगर, रामनगर हा नव्याने झालेला रस्ता अत्यंत धोकादायक झाला असताना, पोलिस मात्र करताहेत काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Goon Rule Returns to Chhatrapati Sambhajinagar; Attempted Murder for Robbery

Web Summary : Criminals are again active in Chhatrapati Sambhajinagar. A man was stabbed in an attempted robbery near Mukundwadi railway station. This marks the second such incident in five days, raising concerns about rising crime and police inaction in the area.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी