सन्मान मायलेकींचा

By Admin | Updated: May 21, 2016 00:19 IST2016-05-21T00:17:12+5:302016-05-21T00:19:08+5:30

औरंगाबाद : प्रत्येक नात्याला काही खास पैलू असतात. प्रत्येक नात्याला त्याचे स्वत:चे सौंदर्य असते. असेच आगळेवेगळे नाते असते माय-लेकीचे.

Honor mylikes | सन्मान मायलेकींचा

सन्मान मायलेकींचा

औरंगाबाद : प्रत्येक नात्याला काही खास पैलू असतात. प्रत्येक नात्याला त्याचे स्वत:चे सौंदर्य असते. असेच आगळेवेगळे नाते असते माय-लेकीचे. तमाम माय-लेकींचा सन्मान शनिवारी लोकमत सखी मंच प्रस्तुत ‘मेरी माँ’ (पॉवर्ड बाय भाग्यविजय) या कार्यक्रमातून केला जाणार आहे. ग्लोबल डिस्कव्हरी स्कूल हे या कार्यक्रमाचे असोसिएट स्पॉन्सरर आहेत. सायं. ५.३० वा. लोकमत लॉन, लोकमत भवन येथे हा कार्यक्र म होईल.
या कार्यक्रमात माय-लेकींचा सन्मान दोन गटांत केला जाईल. पहिला प्रकार म्हणजे ३ ते ६ वर्षे या वयोगटातील मुलीचा तिच्या आईसोबतचा सन्मान आणि दुसरे म्हणजे ६ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या एकुलत्या एका मुलीचा तिच्या आईसोबत होणारा सन्मान. वय वर्षे ३ ते ६ या वयोगटात एकुलती एक मुलगी असणे आवश्यक नाही. कार्यक्रमाला येताना ३ ते ६ या वयोगटातील मुलींनी आणि त्यांच्या आईने गुलाबी रंगाची वेशभूषा करावी, तर अन्य वयोगटाच्या माय-लेकींनी पिवळ्या रंगाची वेशभूषा करावी. या सन्मानासाठी ज्यांनी अजूनही नावनोंदणी केलेली नाही त्यांनी स. १० ते दु. २ या वेळेतच नावनोंदणी क रावी. वेळेवर कोणालाही नावनोंदणी करता येणार नाही. नावनोंदणीसाठी ९८५०४०६०१७ या क्रमांकावर दिलेल्या वेळेत संपर्क साधावा. सखी मंचच्या सदस्य नसलेल्या माय-लेकीही या कार्यक्रमात सहभाग नोंदवू शकतात.
या कार्यक्रमाद्वारे मुलींचा त्यांच्या आईसोबत सन्मान करणे खरोखरच कौतुकास्पद आहे. आमच्या ग्लोबल डिस्कव्हरी स्कूलमध्येही आम्ही हीच शिकवण देण्याचा सदैव प्रयत्न करतो. मुलगा आणि मुलगी यामध्ये आम्ही कधीही कुठल्याही प्रकारची तुलना करीत नाही. विनाकारण मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये तुलना करणारे आपण कोण?
-स्मिता कंचार, संचालिका, ग्लोबल डिस्कव्हरी स्कूल
सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेवून त्यावर तोडगा काढण्याच्या उद्देशानेच ‘लोकमत’कडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. अशा प्रकारचा कार्यक्रम क्वचितच कधी तरी झाला असेल. माय-लेकीच्या नात्याचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमाला शुभेच्छा.
-विजय चाटोरीकर, वास्तुशास्त्र तज्ज्ञ आणि ज्योतिषतज्ज्ञ
सुरेल गीतांचा कार्यक्रम
या कार्यक्र मातच प्रसिद्ध गायक धवल चांदवडकर यांच्या हिंदी व मराठी गाण्यांचा सुरेल नजराणा सखी मंच सदस्यांसाठी असणार आहे. आई आणि मुलीच्या प्रेमाचा गोडवा ‘आई’वर आधारित विविध गीतांमधून दाखवला जाणार आहे. सुरेल गाणी ऐकण्याची संधी यानिमित्ताने सखी मंच सदस्यांना मिळणार आहे.

Web Title: Honor mylikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.