घरमालकास ६० हजारांचा दंड
By Admin | Updated: March 4, 2016 23:36 IST2016-03-04T23:32:33+5:302016-03-04T23:36:25+5:30
परभणी : नळाच्या पाण्याचा अपव्यय करणाऱ्या एका घरमालकास मनपाच्या पथकाने ४ मार्च रोजी ६० हजार रुपयांचा दंड लावला आहे.

घरमालकास ६० हजारांचा दंड
परभणी : नळाच्या पाण्याचा अपव्यय करणाऱ्या एका घरमालकास मनपाच्या पथकाने ४ मार्च रोजी ६० हजार रुपयांचा दंड लावला आहे.
प्रभाग समिती ब चे पथक शुक्रवारी माळीगल्ली परिसरात फिरत होते. यावेळी फजलूर रहेमान अ.समद यांच्या घरी नळाला आलेल्या पाण्याचा अपव्यय करण्यात येत होता.
नळाचे पाणी रस्त्यावर आल्याने सहाय्यक आयुक्त केशव दौंडे, पथकप्रमुख शेख कलीम शेख जिलानी, अब्दुल मजीद काजी, अंबादास शिंदे, बशीर अहेमद काजी, रफीक अहेमद, रमेश गुघाणे, गणेश काकडे, डी. एल. शिंदे यांनी ही कारवाई केली. यात ६० हजारांचा दंड आकारण्यात आला. मनपाने आतापर्यंत अशा प्रकारच्या ६ ते ७ कारवाई केल्या आहेत. (प्रतिनिधी)