निवडणूक भत्त्यापासून होमगार्ड जवान वंचित
By Admin | Updated: July 20, 2014 00:34 IST2014-07-19T23:56:52+5:302014-07-20T00:34:45+5:30
जगदीश पोपळे , सादोळा नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक बंदोबस्त कामी कर्तव्य बजावलेल्या होमगार्ड जवानांना अद्यापपर्यंत भत्ता वाटप न झाल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत़

निवडणूक भत्त्यापासून होमगार्ड जवान वंचित
जगदीश पोपळे , सादोळा
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक बंदोबस्त कामी कर्तव्य बजावलेल्या होमगार्ड जवानांना अद्यापपर्यंत भत्ता वाटप न झाल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत़ भत्ता देण्याची मागणी त्यांच्यामधून होत आहे़
माजलगाव तालुक्यात कार्यरत होमगार्ड अर्थात गृहरक्षक दलातील जवानांची संख्या २०० असून लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी त्यांना पर जिल्ह्यात पाठविण्यात आले होते़ कर्तव्य बजावून चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे़ बंदोबस्ताला रवाना होताना उसनवारीने, व्याजाने पैसे घेऊन त्यांना जावे लागले होते़ अगोदरच्या आर्थिक हलाखीचे जीवन जगत संसाराचा गाडा चालविणाऱ्या या जवानांना कायम सेवेत सामावून घेण्याची वेळोवेळी आश्वासने देण्यात आली आहेत़ मात्र अद्यापपर्यंत ठोस निर्णय झालेला नाही़ भत्त्याव्यतिरिक्त कोणत्याही सुविधा त्यांना मिळत नाहीत़ लोकसभा निवडणुकीतील भत्त्याव्यतिरिक्त दोन वर्षांपासून कर्तव्य भत्ताही प्रलंबित असल्याने या जवानांवर उपासमारीची वेळ आली आहे़ दोन्ही भत्त्यांचे त्वरित वाटप करण्या यावेत, अशी मागणी गोरख फुलवरे, विक्रम यमगर, शंकर तावरे, संजय सुतार आदी होमगार्ड जवानांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे़
याबाबत जिल्हा समादेशक मारुती कळेकर म्हणाले, जिल्ह्यातील होमगार्ड जवानांचे निवडणूक बंदोबस्त भत्ता देयक प्रलंबित आहे़ त्याचा पाठपुरावा सुरु आहे़