ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्षाचे गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:20 IST2021-02-05T04:20:38+5:302021-02-05T04:20:38+5:30
औरंगाबाद : शहरात ज्येष्ठ नागरिकांना फोन करून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्तालयातील ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्षाचे ...

ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्षाचे गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
औरंगाबाद : शहरात ज्येष्ठ नागरिकांना फोन करून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्तालयातील ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्षाचे उद्घाटन केले.
शहरातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांना आवश्यक असेल तेव्हा मदत मिळावी, याकरिता पोलीस आयुक्तालयात ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्षाचे औपचारिक उद्घाटन मंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. यानंतर गृहमंंत्र्यानी जीपीएस बेस्ड क्यू आर कोड गस्ती पथक यंत्रणेचा शुभारंभ केला. यानंतर त्यांनी गुन्हे आढावा बैठक घेतली. क्यू आर कोड गस्ती वाहनामुळे कामचुकार पोलिसांना चपराक बसेल, असे नमूद करीत पोलीस आयुक्तांच्या आधुनिक गस्त प्रणालीचे देशमुख यांनी कौतुक केले. ग्रामीण पोलिसांनी नुकतेच महिला अमलदार बीट मार्शल गस्त सुरू केली. अशी गस्त शहरात सुरू करण्याची सूचना त्यांनी केली. गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्हे वाढत आहेत. यामुळे सायबर तपासांत आवड असलेल्या पोलिसांना याविषयी अधिक प्रशिक्षण देऊन तपास करावा, असे त्यांनी नमूद केले.
चौकट
कोविड योद्ध्यांचा सत्कार
कोरोना कालावधीत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गृहमंत्री देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी आ. विक्रम काळे, आ. अमोल मिटकरी,पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, मीना मकवाना, दीपक गिऱ्हे यांची उपस्थिती होती.