सर्वपक्षियांतर्फे श्रद्धांजली
By Admin | Updated: June 6, 2014 01:10 IST2014-06-06T00:07:14+5:302014-06-06T01:10:00+5:30
हिंगोली : केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्ल श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी शोकसभा घेण्यात आल्या.
सर्वपक्षियांतर्फे श्रद्धांजली
हिंगोली : केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्ल श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी शोकसभा घेण्यात आल्या. यावेळी सर्वपक्षियांतर्फे मुंडे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
शहरातील महात्मा गांधी चौकात गुरूवारी घेण्यात आलेल्या सर्वपक्षीय शोकसभेत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेत सर्वपक्षांचे नेते तसेच कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. शोकसभेस नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जि. प. च्या अध्यक्षा मिनाक्षी बोंढारे, उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, माजी आ. गजानन घुगे, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, भाजप कार्यकारणी सदस्य तान्हाजी मुटकुळे, बाजार समिती उपसभापती रामेश्वर शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, पं. स. चे उपभापती विनोद नाईक, नगरसेवक बिरजू यादव, गणेश बांगर, अनिल नैनवाणी, जैठानंंद नैनवाणी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशचंद्र बगडिया, प्रकाशचंद्र सोनी, धरमचंद बडेरा, गोवर्धन विरकुँवर, पुंजाजी गाडे, संजय दराडे, माधव कोरडे, उमेश गुठ्ठे, डॉ. श्रीधर कंदी, अॅड. गणेशराव ढाले, डॉ. राजेश भोसले, सुरेशअप्पा सोनी, शरद जयस्वाल, सदाशिव सुर्यतळ, डॉ. उमेश नागरे, सुभाष लदनिया, सुरजितसिंह ठाकूर, डॉ. विजय निलावार, अशोकराव दिंडे पाटील, दत्तराव दिंडे, सूर्यभान ढेंगळे, उत्तमराव जगताप, प्रमोद मंदडा, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजू गोडबान, शिक्षक संघटनेचे रमेश गंगावणे, गोविंद गुठ्ठे, काँग्रस प्रवक्ते विलास गोरे, अॅड. के. के. शिंदे, पांडुरंग पाटील, उत्तमराव जगताप, देशपांडे, गोपाल दुबे, जोशी, रविकुमार कान्हेड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. शोकसभेत नेत्यांनी गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करून भावना व्यक्त केल्या. मुंडे यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या जाण्याने मराठवाड्याचे नव्हे तर देशाचे नुकसान झाले.
भाजपात बहुजनांना स्थान देवून कार्यकर्त्यांना मोठे करणार्या लोकनेत्याच्या जाण्यामुळे झालेले दु:ख अनेकांनी व्यक्त केले. सुत्रसंचालन फुलाजी शिंदे यांनी केले.
सेनगाव येथेही गोपीनाथ मुंडे यांना एका कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली. भाजपाचे नेते व देशाचे ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राचे व भाजपाचे मोठे नेतृत्व हरवले असून येणार्या काळात मराठवाड्याचा हा भूमीपुत्र नक्कीच मुख्यमंत्री झाला असता.
हिंगोली जिल्हा निर्मितीत गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वाटा असून त्यांच्या जाण्याने मराठवाडा पोरका झाला असल्याची भावना हिंगोली मतदारसंघाचे माजी आ. बळीराम पाटील कोटकर यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)