वेतनवाढीसंदर्भात समितीच्या अहवालाची औरंगाबादेत होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:02 IST2018-01-26T00:02:50+5:302018-01-26T00:02:54+5:30
एसटी महामंडळातील कर्मचा-यांच्या वेतनवाढीसंदर्भात उच्चस्तरीय समितीने दिलेल्या अहवालाची होळी करीत गुरुवारी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला. विभाग नियंत्रक कार्यालय, चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळा आणि बसस्थानकात अहवालाचा निषेध व्यक्त करीत कर्मचाºयांनी जोरदार घोषणा दिल्या.

वेतनवाढीसंदर्भात समितीच्या अहवालाची औरंगाबादेत होळी
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एसटी महामंडळातील कर्मचा-यांच्या वेतनवाढीसंदर्भात उच्चस्तरीय समितीने दिलेल्या अहवालाची होळी करीत गुरुवारी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला. विभाग नियंत्रक कार्यालय, चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळा आणि बसस्थानकात अहवालाचा निषेध व्यक्त करीत कर्मचाºयांनी जोरदार घोषणा दिल्या.
आॅक्टोबरमध्ये वेतनवाढीसाठी एसटी कर्मचाºयांनी संप पुकारल्यानंतर उच्च न्यायालयाने यासंदर्भात उच्चस्तरीय समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. हा अहवाल नुकताच प्राप्त झाला; परंतु हा अहवाल कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून तयार केल्याचे म्हणत एसटी कर्मचाºयांच्या कृती समितीने तो फेटाळला. विभाग नियंत्रक कार्यालयाच्या परिसरात गुरुवारी अहवालाची होळी करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे सुरेश जाधव, किरण कल्हापुरे, मच्छिंद्र बनकर, मिलिंद मुळे, शरद चेमटे, राहुल घोरपडे, रामेश्वर वानखेडे, श्याम दाभाडे, प्रवीण चव्हाण, शिवाजी जाधव, सोमनाथ घनवट, सिद्धार्थ खंदारे, एस. के. जिलानी, जे. एस. ढाकणे आदी कर्मचारी उपस्थित होते. मध्यवर्ती बसस्थानकातही अहवालाची होळी करण्यात आली.
चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत अहवालाचा निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी सुजित गोसावी, एस. डी. कावळे, प्रमोद राजमाने, प्रल्हाद वडीपल्ली, डी. जी. कातारे, डी. के. राऊत, शेख तालेब, आर. एन. पवार, एल. एन. गायकवाड आदी उपस्थित होते.