हॉकी : महिला संघ निवडण्यासाठी सिलेक्शन ट्रायल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:37 IST2018-01-16T00:37:42+5:302018-01-16T00:37:58+5:30
रांची येथे १ ते ११ फेब्रुवारीदरम्यान सिनिअर महिलांची राष्ट्रीय हॉकी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणारा महाराष्ट्र संघ निवडण्यासाठी १७ जानेवारी रोजी सिलेक्शन ट्रायलचे आयोजन करण्यात येणार आहे.

हॉकी : महिला संघ निवडण्यासाठी सिलेक्शन ट्रायल
औरंगाबाद : रांची येथे १ ते ११ फेब्रुवारीदरम्यान सिनिअर महिलांची राष्ट्रीय हॉकी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणारा महाराष्ट्र संघ निवडण्यासाठी १७ जानेवारी रोजी सिलेक्शन ट्रायलचे आयोजन करण्यात येणार आहे. या सिलेक्शन ट्रायलसाठी औरंगाबादचे सर्वोत्तम खेळाडूदेखील पाठवण्यात येणार आहेत. हे खेळाडू निवडण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल येथे १६ जानेवारी रोजी संघटनेतर्फे निवड चाचणी आयोजित करण्यात येणार आहे. सहभागी होऊ इच्छिणाºया खेळाडूंनी क्रीडा प्रबोधिनीच्या हॉकी प्रशिक्षिका नम्रता शाहू आणि शामसुंदर भालेराव यांच्याशी संपर्क साधावा.