हॉकी : ९ मार्चला निवड चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:32 IST2018-03-06T00:32:44+5:302018-03-06T00:32:56+5:30

औरंगाबाद जिल्हा हॉकी संघटनेतर्फे जिल्ह्याचा ज्युनिअर मुले व मुलींचा संघ निवडण्यासाठी ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रात ९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीतून औरंगाबाद जिल्ह्यातील मुले व मुलींच्या गटातील अव्वल पाच खेळाडूंची निवड केली जाणार आहे.

 Hockey: selection test on 9th March | हॉकी : ९ मार्चला निवड चाचणी

हॉकी : ९ मार्चला निवड चाचणी

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा हॉकी संघटनेतर्फे जिल्ह्याचा ज्युनिअर मुले व मुलींचा संघ निवडण्यासाठी ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रात ९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
या निवड चाचणीतून औरंगाबाद जिल्ह्यातील मुले व मुलींच्या गटातील अव्वल पाच खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या खेळाडूंना पुणे येथे महाराष्ट्राचा संघ निवडण्यासाठी होणाºया सिलेक्शन ट्रायल्ससाठी पाठवण्यात येणार आहे. पुणे येथे निवडण्यात येणारा महाराष्ट्राचा संघ भोपाळ येथे २६ एप्रिल ते ६ मेदरम्यान होणाºया राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.
औरंगाबाद येथे होणाºया निवड चाचणीत सहभागी होऊ इच्छिणाºया खेळाडूंनी सोबत जन्मदाखल्यासह साईच्या पश्चिम विभागीय केंद्राच्या हॉकी मैदानावर उपस्थित राहावे. या निवड चाचणीत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन औरंगाबाद जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, हॉकी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष पंकज भारसाखळे, अशोक सायन्ना, डॅनियल फर्नांडिस, कमांडर विनोद नरवडे, प्रदीप खांड्रे, शेख साजीद, शामसुंदर भालेराव, संजय तोटावाड, समीर शेख, सुयश पंडागळे आदींनी केले आहे.

Web Title:  Hockey: selection test on 9th March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.