शौक बडी चीज है ! शहरातील रस्त्यावर धावतायत कोट्यवधींची परदेशी वाहने !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2022 03:09 PM2022-01-28T15:09:05+5:302022-01-28T15:12:01+5:30

वर्षभरात १२ वाहनांची भर : २.१७ कोटी रुपये किमतीच्या २ वाहनांचा समावेश, लाखो रुपयांच्या दुचाकींची ‘धूम’

Hobby is a big thing! Billions of foreign vehicles running on city streets! | शौक बडी चीज है ! शहरातील रस्त्यावर धावतायत कोट्यवधींची परदेशी वाहने !

शौक बडी चीज है ! शहरातील रस्त्यावर धावतायत कोट्यवधींची परदेशी वाहने !

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावाचा बाजारपेठांवर परिणाम झाला असला तरी ‘शौक बडी चीज है’ची अनुभूती वाहनांच्याबाबतीत पाहण्यास मिळत आहे.
शहरातील रस्त्यांवर गेल्या वर्षभरात परदेशी बनावटीच्या तब्बल १२ वाहनांची भर पडली. यामध्ये तब्बल २.१७ कोटी रुपये किमतीच्या २ मर्सिडिझ-बेंझचा समावेश आहे. केवळ कोट्यवधी रुपयांच्या कारच नव्हे तर महागड्या दुचाकीही औरंगाबादच्या रस्त्यावर धावत आहेत.

हौसेला मोल नसते, असे म्हणतात. त्यात औरंगाबादकरांच्या हौसेला तर उधाण येत असल्याचे वाहन विक्रीवरून दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात ६१ हजार नव्या वाहनांची भर जिल्ह्यात पडली असून, जिल्ह्यातील एकूण वाहनांची संख्या आता १६ लाखांच्या घरात गेली आहे. औरंगाबादेत केवळ भारतीय बनावटीचीच नव्हे तर परदेशी बनावटीच्या महागडी वाहने खरेदीला प्राधान्य देणारेही आहेत.

गेल्या काही वर्षात महागडी वाहने खरेदी करण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षभरात २१ लाखांपासून तर २.१७ कोटी रुपये किमत असलेल्या १२ परदेशी बनावटीची वाहनांची आरटीओ कार्यालयात नोंद झाली. यात १० चारचाकी, तर २ दुचाकींचा समावेश आहे. यात ८.४२ लाख आणि ७.९९ लाख रुपये किमत असलेल्या २ दुचाकी औरंगाबादेतील रस्त्यावर दाखल झाल्या आहेत. औरंगाबादेत काही पहिल्यांदाच परदेशी बनावटीची वाहने आलेली नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक वर्षी या वाहनात भर पडत आहे.

२० लाख रुपयांचा कर
२.१७ कोटी रुपयांच्या २ चारचाकी वाहनांच्या टॅक्सपोटी आरटीओ कार्यालयाच्या तिजोरीत प्रत्येकी २० लाख रुपये जमा झाले. इतर वाहनांनीही करापोटी मोठा महसूल दिला.

जिल्ह्यातील एकूण वाहने-१५,६४,११९
एकूण परदेशी बनावटीची वाहने-१७४

- परदेशी बनावटीची वाहने चारचाकी-११४
- परदेशी बनावटीची वाहने दुचाकी-६०

Web Title: Hobby is a big thing! Billions of foreign vehicles running on city streets!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.