लामजना पाटी येथे इसमाचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: April 10, 2015 00:28 IST2015-04-10T00:13:29+5:302015-04-10T00:28:38+5:30
किल्लारी : लामजना पाटी येथे एका ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आला आहे़ हा अपघात आहे की, घातपात करण्यात आला आहे़

लामजना पाटी येथे इसमाचा संशयास्पद मृत्यू
किल्लारी : लामजना पाटी येथे एका ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आला आहे़ हा अपघात आहे की, घातपात करण्यात आला आहे़ यासह या इसमाची ओळख पटविण्यात गुरुवारी दिवसभर पोलिसांना यश येऊ शकले नाही़
गुरुवारी सकाळी ७ च्या सुमारास लामजना पाटी येथे एका ४० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला़ हा मृतदेह पाहून भालचंद्र बोडके यांनी पोहेकॉ़ गौतम कांबळे यांना माहिती दिली़ त्यावरून किल्लारी पोलिस ठाण्याचे सपोनि़ विश्वजीत घोडके यांनी भेट देऊन पाहणी केली़ यावेळी सदरील इसमाच्या डोळ्यास व कानास गंभीर मार लागल्याचे आढळून आले़ तसेच तोंड आणि कानातून रक्त येत होते़ त्यामुळे घातपाताची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे़
घटनास्थळास उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेलार यांनी भेट देऊन पाहणी केली़ सदरील इसमाच्या हातात भगवा दोरा असल्याने तो शिवसेना कार्यकर्ता असल्याची चर्चा सुरु होती़ दरम्यान, काहींनी उसतोड कामगार असल्याचे सांगितले़ गुरुवारी रात्रीपर्यंत या इसमाची ओळख पटू शकली नाही़ याप्रकरणाचा किल्लारी पोलीस तपास करीत आहेत़ (वार्ताहर)