सासरच्यांचे घर दासखेडमध्ये जाळले

By Admin | Updated: May 4, 2017 23:19 IST2017-05-04T23:17:22+5:302017-05-04T23:19:41+5:30

पाटोदा : कविता प्रकाश कोकाटे या गरोदर विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळला होता. संतप्त माहेरकडील मंडळींनी सासरच्यांचे राहते घर जाळले.

His house was burnt in the house of Daskhed | सासरच्यांचे घर दासखेडमध्ये जाळले

सासरच्यांचे घर दासखेडमध्ये जाळले

पाटोदा : तालुक्यातील दासखेड येथे कविता प्रकाश कोकाटे या गरोदर विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळला होता. संतप्त माहेरकडील मंडळींनी बुधवारी रात्री सासरच्यांचे राहते घर जाळले.
कवितावर सायंकाळी शोकाकूल वातावरण अंत्यसंस्कार पार पडले. कोकाटे कुटुंबीय गावालगतच्या शेतात वास्तव्यास आहे. माहेरकडील मंडळींनी अंत्यसंस्कारानंतर शेतात जाऊन राहते घर पेटविले. यात संसारोपयोगी साहित्य, धान्य जळून खाक झाले. बंदोबस्तावर असलेले पोकाँ नंदकिशोर बासर, विष्णू जायभाये यांनी अग्निशमन दलाचा बंब पाचारण करून आग विझवली. कविताचा पती व सासरा पोलिसांच्या ताब्यात असून, गुरूवारी रात्रीपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता. (वार्ताहर)

Web Title: His house was burnt in the house of Daskhed