वेतनातून घरभाडे, दंडाची रक्कम कपात केल्याशिवाय वेतन नाही !

By Admin | Updated: December 14, 2015 23:53 IST2015-12-14T23:52:49+5:302015-12-14T23:53:04+5:30

हणमंत गायकवाड , लातूर वेतनातून घरभाड्याची वसुली; शिवाय, दंड आणि घर सोडणे अशी कारवाई अनधिकृत वास्तव्यास असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर होणार आहे.

Hire from the wages, without paying the penalty, there is no salary! | वेतनातून घरभाडे, दंडाची रक्कम कपात केल्याशिवाय वेतन नाही !

वेतनातून घरभाडे, दंडाची रक्कम कपात केल्याशिवाय वेतन नाही !


हणमंत गायकवाड , लातूर
वेतनातून घरभाड्याची वसुली; शिवाय, दंड आणि घर सोडणे अशी कारवाई अनधिकृत वास्तव्यास असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर होणार आहे. त्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार आहे. प्रारंभी वेतनातून घरभाडे व दंडाची रक्कम कपात केल्याशिवाय या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करू नयेत, असे निर्देशच जिल्हाधिकाऱ्यांनी कोषागार कार्यालयाला दिले आहेत.
औसा रोडवरील संक्रमण निवासस्थानात २७ आणि बार्शी रोडवरील शासकीय निवासस्थानांत ७१ असे एकूण ९८ अधिकारी-कर्मचारी अनधिकृतपणे वास्तव्यास आहेत. त्यांची लातुरात ड्युटी नाही. शिवाय, यातील अनेक कर्मचारी सेवानिवृत्तही झाले आहेत. त्यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीचा आदेश नाही. तरीही या निवासस्थानांचा ते ताबा सोडत नाहीत. आता जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना घराबाहेर काढण्यासाठी प्रारंभी नोटिसा पाठविल्या आहेत. त्यानंतर त्यांच्या वेतनातून घरभाडे व दंड वसूल करण्याची नोटीस. घर खाली करण्यासाठी अतिक्रमणाच्या धर्तीवर मोहीम राबविण्याची तयारी आदी प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे अनधिकृत वास्तव्यास असलेल्या या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आता कारवाई अटळ आहे.

Web Title: Hire from the wages, without paying the penalty, there is no salary!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.