शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अपहाराचा महामार्ग; तलाठी ते जिल्हाधिकारी सर्वच यंत्रणेचे लागेबांधे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 13:58 IST

एनएच-२११ हा पूर्ण प्रकल्प ७ हजार कोटींचा आहे. त्यात भूसंपादनाची रक्कम आहे.

ठळक मुद्देनगर भूमापननेही छातीठोक सांगितलेऔरंगाबाद ते धुळे या पट्ट्यातील कामाला अजून गती मिळालेली नाही. 

- विकास राऊत

औरंगाबाद : मराठवाड्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- २११ साठी  चार जिल्ह्यांतील भूसंपादन करताना तत्कालीन जिल्हाधिकारी ते तलाठी सर्वच यंत्रणेचे लागेबांधे होते. हे मधुर संबंध जुळून आल्यानंतरच १४० कोटी रुपयांचा मावेजा वाटप करण्यात आला.  एनएचएआय, कॉम्पिटंट अ‍ॅथॉरिटी ऑफ लॅण्ड अ‍ॅक्वायजेशन (काला), जिल्हा प्रशासन, भूमी अभिलेख, नगररचना यांच्या मान्यतेने हे भूसंपादन करण्यात आल्याने याविषयी ‘उडदामध्ये काळेगोरे’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड आणि जालना जिल्ह्यांत जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतरच भूसंपादनाचा मावेजा देण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये २०११ ते २०२० या काळात सात जिल्हाधिकारी आले व गेले. यामध्ये कुणालकुमार, विक्रमकुमार, वीरेंद्रसिंग, निधी पांडे, एन.के. राम, उदय चौधरी आणि विद्यमान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा समावेश आहे. एनएच- २११ साठी कुणालकुमार ते एन.के. राम यांच्या कार्यकाळात भूसंपादनाची प्रक्रिया झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात या काळात प्रवीण गेडाम, के.एच. नागरगोजे, प्रशांत नारनवरे, राधाकृष्ण गमे, दीपा मुधोळ आणि विद्यमान जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यापैकी नागरगोजे, नारनवरे, गमे या जिल्हाधिकाऱ्यांच्या काळात भूसंपादन झाले. 

बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी एस.जे. कोचे, एस.एम. केंद्रेकर, एन.के. राम, एम.डी. सिंह, आस्तिककुमार पाण्डेय, अजित कुंभार आणि विद्यमान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यापैकी कोचे, केंद्रेकर, राम आणि सिंह यांच्या कार्यकाळात भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आली, तर जालना जिल्ह्यात २०११ साली विलास ठाकूर जिल्हाधिकारी होते. त्यानंतर तुकाराम मुंढे, श्याम देशपांडे, शिवाजी जोंधळे आणि विद्यमान जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे काम पाहत आहेत. मुंढे, देशपांडे, जोंधळे यांच्या काळात भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आली. 

किती कोटींचा आहे प्रकल्पएनएच-२११ हा पूर्ण प्रकल्प ७ हजार कोटींचा आहे. त्यात भूसंपादनाची रक्कम आहे. २५० कि.मी.चा पूर्ण पट्टा आहे. ३,५०० कोटी औट्रम घाटासाठी आहेत. २०११ साली हा प्रकल्प मंजूर झाला होता. औरंगाबाद ते धुळे या पट्ट्यातील कामाला अजून गती मिळालेली नाही. 

उपविभागीय अधिकाऱ्यांवरच जबाबदारीजिल्हा प्रशासनातील उपविभागीय अधिकाऱ्यांवर भूसंपादनाची जबाबदारी देण्यात आलेली होती. उस्मानाबाद, बीड, जालना आणि औरंगाबादमध्ये २०११ ते २०१८ पर्यंत टप्प्याटप्प्याने भूसंपादन करताना उपविभागीय अधिकाऱ्यांनी मावेजा देण्याचे निवाडे केले. महामार्गालगत जमिनी दाखवून दिलेल्या मोबदल्याप्रकरणी पूर्ण विभागातील सर्व यंत्रणा आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी पुढे येत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गfundsनिधी