सहा वर्षात तुरीला सर्वाधिक भाव

By Admin | Updated: April 12, 2015 00:55 IST2015-04-12T00:55:18+5:302015-04-12T00:55:18+5:30

लातूर : लातूर जिल्ह्यात गतवर्षीच्या प्रमाणात यावर्षीही अल्पपर्जन्यमान झाले आहे़ त्यामुळे तुरीच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे़

The highest prices in six years | सहा वर्षात तुरीला सर्वाधिक भाव

सहा वर्षात तुरीला सर्वाधिक भाव


लातूर : लातूर जिल्ह्यात गतवर्षीच्या प्रमाणात यावर्षीही अल्पपर्जन्यमान झाले आहे़ त्यामुळे तुरीच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे़तुरीला गेल्या पाच ते सहा वर्षाच्या कालावधी नंतर सध्याच्या कालावधीत चांगला भाव आल्याने राज्यासह परराज्यातील दिवसाकाठी दहा हजार क्विंटल तुरीची आवक होत आहे़
गतवर्षी झालेली गारपीठ, त्यातच चालू वर्षात झालेले अल्प प्रर्जन्यमान यामुळे तुरीच्या उत्पादनाबरोबरच इतर पिकांच्याही उत्पादनात कमालीची घट झाली आहे़सध्या लातूर बाजारपेठेत बाजरी, गहू, ज्वारी, मका, हरभरा, तूर, करडई, सोयाबीन, सुर्यफुल, आदी पिकांची आवक सुरू आहे़लातूर बाजारपेठेत बाजरी १२८० ते १५०० रूपये, गहू १८०० ते ३१००,ज्वारी ११५० ते १४१०, ज्वारी रब्बी २२५१ ते २५००, मका १२३० ते १४००, तूर ६२०० ते ६७२५,उडीद ६२५० ते ६३७०, करडई २४८० ते २८२०, सोयाबीन ३२०० ते ३५६०,सुर्यफूल ३२०० ते ३४४१, या प्रमाणात प्रतिक्विंटल भाव आहे़सध्या तुरीची आवक चार हजार क्विंटल, सोयाबीन १० हजार क्ंिवटल,मका १२ हजार क्विंटल, करडई १०१ क्विंटल, सुर्यफुल २५४ क्विंटल,या प्रमाणात शेतीमालाची विक्रीसाठी आवक होत आहे़ गतवर्षी झालेली गारपीठ त्यानंतर चालू वर्षात झालेले अल्प पर्जन्यमान यामुळे सर्वच पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे़ गतवर्षीच्या प्रमाणात एकूण उत्पादनापैकी २० टक्के तुरीची आवक सुरू झाली आहे़ यामध्ये परभणी,बीड, परळी,उमरगा, बार्शी, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातील तुरीच्या उत्पादनाबरोबरच तुरीची आवक सुरू झाली आहे़ परंतु गतवर्षीच्या प्रमाणात तुरीची आवक कमी झाली असल्यामुळे तुरीच्या भावात कमालीची वाढ झाली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The highest prices in six years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.