शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
3
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
4
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
5
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
6
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
7
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
8
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
9
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
10
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
11
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
12
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
13
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
14
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
15
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
16
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
17
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
18
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
19
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
20
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण

उंच गतिरोधक, अरुंद रस्ते अन् सुसाट वाहने; बेफाम वेगाने घेतला दोन युवकांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:02 IST

एक दुचाकी पोलिसांच्या गाडीखाली, दुसऱ्याला कारने उडवले

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे अरुंद रस्त्यावर सुसाट कारच्या धडकेत आई-वडिलांनी एकुलता एक मुलगा गमावला तर दुसऱ्या घटनेत तरुणाचा गतिरोधकावरून दुचाकी उडून थेट पोलिसांच्या वाहनाच्या चाकाखाली सापडून करुण अंत झाला. सोमवारी दोन कुटुंबांनी घरातले तरुण गमावल्याच्या या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. ओम अजय महाजन (२१, रा. नारेगाव) व विष्णू काशीनाथ खर्जुले (२६, रा. करमाड) अशी मृत युवकांची नावे आहेत.

ओम आई-वडिलांसह नारेगावमध्ये राहत होता. त्याचे वडील खासगी नोकरी करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही ओमने अभ्यास करून अभियांत्रिकीला प्रवेश मिळवला होता. तो तृतीय वर्षात होता. रविवारी रात्री ९ वाजता तो क्लासवरून दुचाकीने घरी परतत असताना नारेगावच्या जय भवानी चौकात त्याला सुसाट कारने (एमएच २० -जीआर -७९०१) उडवून पोबारा केला. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, सोमवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

गतिरोधकावरून उडाला, पोलिस वाहनाने चिरडलेसोमवारी रात्री ८ वाजता विमानतळ परिसरात विष्णू खर्जुले (२६) या तरुणाचा वाहनाखाली मृत्यू झाला. विष्णू करमाडच्या दिशेने निघाला होता. याच वेळी एमआयडीसी सिडको पोलिस चिकलठाण्यातील दोन शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणात पंचनामा करण्यासाठी शासकीय वाहनातून (एमएच २० -एचबी-९३२१) निघाले हाेते. विमानतळाच्या विरुद्ध दिशेच्या न्यू हायस्कूलसमोरील उंच गतिरोधकावरून विष्णूचा दुचाकीवरील तोल सुटून तो कोसळला. त्याच वेळी मागून जाणाऱ्या पोलिसांच्या सुसाट वाहनाखाली चिरडला गेला.

महिनाभरात पती, मुलाला गमावलेदोन विवाहित बहिणी असलेला विष्णू लहान भाऊ व आईसह करमाडला राहत होता. महिनाभरापूर्वीच आजारपणामुळे त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. महिनाभरात पतीसह मोठा मुलगाही गमवावा लागल्याने त्याच्या आईचा आक्रोश प्रत्येकाचे मन हेलावून गेला.

पोलिसांची याच घटनेत इतकी तत्परता का ?-पोलिसांच्या दाव्यानुसार, गतिरोधकावरून उडून दुसऱ्या दुचाकीच्या हँडलचा धक्का लागून विष्णू पोलिसांच्या वाहनाला धडकला. प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानुसार, गतिराेधकावरून उडाल्यानंतर विष्णू रस्त्यावर कोसळला. त्यानंतर पोलिसांचे वाहन त्याच्या अंगावरून गेले.-सामान्यत: अपघाती मृत्यू प्रकरणात पोलिस कुटुंबाची फिर्याद घेतात. सहसा शवविच्छेदनाच्या अहवालानंतर गुन्हा दाखल होतो. मात्र, विष्णूच्या मृत्यू प्रकरणात ८ वाजेच्या अपघातात शवविच्छेदनाआधीच पोलिसांनी स्वत:च फिर्यादी होत १:४३ वाजेपर्यंत गुन्हा दाखल करून टाकला. त्यामुळे नेमके दोषी कोण, हा प्रश्न जाणीवपूर्वक अनुत्तरित ठेवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.

टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDeathमृत्यू