शेतकऱ्यांना मिळणार मदत

By Admin | Updated: January 15, 2015 00:07 IST2015-01-14T23:43:15+5:302015-01-15T00:07:36+5:30

दिलीप सारडा ,बदनापूर तालुक्यातील पाच महसुल मंडळातील ४८ हजार शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळणार आहे

Helping farmers get help | शेतकऱ्यांना मिळणार मदत

शेतकऱ्यांना मिळणार मदत


दिलीप सारडा ,बदनापूर
तालुक्यातील पाच महसुल मंडळातील ४८ हजार शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळणार आहे
तालुक्यात पाच महसुली मंडळे असून या सर्व मंडळाअंतर्गत तहसिल कार्यालयाने आपल्या क्षेत्रातील शेतकरी व त्यांचे बाधित क्षेत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविले आहे़ बदनापूर महसुल मंडळात अल्प व अत्यल्प भुधारक ५६४६ शेतकरी आहे़ त्यांचे ४१७६़६४ बाधित जिरायत क्षेत्र, २०९ हेक्टर बाधित बागायती क्षेत्र व ३८६़२६ बाधित बहुवार्षिक फळपिक क्षेत्र ३८६़२६ हेक्टर असे एकुण बाधित क्षेत्र ४७७१़९० हेक्टर आहे़ दाभाडी महसुल मंडळात एकुण ७९९६ शेतकरी आहे़ त्यांचे बाधित जिरायत क्षेत्र ७०२१़२३ हेक्टर, बाधित बागायती क्षेत्र ३११़५२ हे., बाधित बहुवार्षिक फळपिक क्षेत्र २३७़६१ हे. असे एकुण बाधित क्षेत्र ७५७०़३६ हेक्टर आहे़
रोषणगाव महसुल मंडळात एकुण ८५९१ शेतकरी असुन त्यांचे बाधित जिरायत क्षेत्र ७३५६़३३ हे., बाधित बागायती क्षेत्र ३१४़३१ हे., बाधित बहुवार्षिक फळपिक क्षेत्र ४७४़८३ हे. असे एकुण बाधित क्षेत्र ८१४५़४७ हेक्टर आहे़
शेलगाव महसुल मंडळात एकुण ८८८२ शेतकरी असुन त्यांचे बाधित जिरायत क्षेत्र ७३६८़६९ हे., बागायती क्षेत्र ३४७़९० हे., बहुवार्षिक फळपिक क्षेत्र ४७८़७० हे. असे एकुण बाधित क्षेत्र ८१९५़२९ हेक्टर आहे़ बावणेपांगरी महसुल मंडळात एकुण १०३१० शेतकरी आहे़त त्यांचे बाधित जिरायत क्षेत्र ९८४४़५२ हे., बागायती क्षेत्र ३४०़५६ हे., बहुवार्षिक फळपिक क्षेत्र १०८़३३ हे. असे एकुण बाधित क्षेत्र १०२९३़८२ हेक्टर आहे़
अशा प्रकारे तालुक्यात अल्प व अत्यल्प भुधारक गटात एकुण ४१४२५ शेतकरी असुन त्यांचे एकुण ३५७६७़४१ हेक्टर जिरायत क्षेत्र बाधित, १५२३़२९ हे. बागायती, १६८५७३ हे. क्षेत्र बहुवार्षिक फळपिक बाधित झालेले आहे़ बहुभुधारक गटात या तालुक्यात या पाच महसुलमंडळा अंतर्गत एकुण ७३२३ शेतकरी असुन त्यांचे एकुण २२३६६़२२ हेक्टर जिरायत क्षेत्र बाधित, १७३़६८ हेक्टर बागायती क्षेत्र बाधित, ९२२़२६ हे क्षेत्र बहुवार्षिक फळपिक बाधित क्षेत्र झालेले आहे़ या गटात एकुण २३४६५़१६ हेक्टर खरीप हंगामाचे पेरणी केलेले संपूर्ण क्षेत्र दुष्काळामुळे बाधित झालेले आहे़ अशा प्रकारे तालुक्यात या दोन्ही गटातील एकुण ४८७४८ बाधित शेतकरी असुन त्यांना लवकरच दुष्काळी मदत दिली जाणार आहे.

Web Title: Helping farmers get help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.