पुरावा नष्ट करण्याच्या कामात मदत केल्याने शिक्षकावर गुन्हा दाखल
By Admin | Updated: April 4, 2017 23:25 IST2017-04-04T23:23:15+5:302017-04-04T23:25:57+5:30
अंबड : बलात्कार प्रकरणातील आरोपीला पुरावा नष्ट करण्याच्या कामात मदत केल्याप्रकरणी एका शिक्षकावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुरावा नष्ट करण्याच्या कामात मदत केल्याने शिक्षकावर गुन्हा दाखल
अंबड : बलात्कार प्रकरणातील आरोपीला पुरावा नष्ट करण्याच्या कामात मदत केल्याप्रकरणी एका शिक्षकावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
न्यायालयाच्या निर्देशाने गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संबंधित शिक्षकाची पोलीस चौकशी करत आहेत. शिक्षकास लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील चिंचखेड येथील एका खाजगी संस्थेच्या विद्यालयात आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गातील विद्यार्थ्यांने जून महिन्यात बलात्कार केल्याचा पीडितेचा आरोप आहे. आरोपीने धमकी दिल्याने घाबरलेल्या पीडितेने ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही. मात्र बलात्कारामुळे मुलीला गर्भधारणा झाली, गर्भधारणा झाल्यानंतर पाच महिन्यांनी ही गोष्ट मुलीच्या कुटुंबियांच्या लक्षात आली. बदनामीच्या भीतीने मुलीच्या कुटुंबियांनी तिला औरंगाबाद येथील नातेवाईकांकडे पाठवून दिले. औरंगाबाद येथे पीडित मुलीने खाजगी रुग्णालयात बाळाला जन्म दिला. रुग्णालय व्यवस्थापनाने याची माहिती औरंगाबादेतील भारतीय समाज सेवा केंद्र या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पीडितेकडून खरा प्रकार जाणून घेतला.