मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना दिली मदत
By Admin | Updated: September 3, 2014 01:11 IST2014-09-03T00:47:42+5:302014-09-03T01:11:28+5:30
बीड: गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळाकडून लाखो रुपये खर्च करण्यात येतो. मात्र गोळा केलेली वर्गणी समाजिक कार्यास देण्यास कोणीही पुढे येत नाही़ याला अपवाद ठरलेत परळी तालुक्यातील पोहनेर येथील तीन गणेश मंडळ.

मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना दिली मदत
बीड: गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळाकडून लाखो रुपये खर्च करण्यात येतो. मात्र गोळा केलेली वर्गणी समाजिक कार्यास देण्यास कोणीही पुढे येत नाही़ याला अपवाद ठरलेत परळी तालुक्यातील पोहनेर येथील तीन गणेश मंडळ. अपघातात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना एक लाख रुपयांची मदत देऊन सामाजिक बांधिलकीचा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला आहे.
परळी-बीड रस्त्यावरील नाथ्रा फाटा येथे दुचाकीवरुन जाणाऱ्या तिघांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याची घटना २२ आॅगस्ट रोजी घडली होती़ पोहनेर येथील सखाराम (राजाभाऊ) धोंडिबा गात (वय २७) यांच्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाला होता़
घरातील कर्ताव्यक्ती अचानक निघून गेल्यामुळे त्याच्या कुटुंबांवर संकटच कोसळले़ त्यामुळे सिरसाळा पोलीस ठाण्याचे बीट जमादार आऱबी़ सिरसट यांनी गात यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्याचा निर्धार व्यक्त केला़ त्यावेळी गणेश उत्सवाच्या वर्गणीला सुरुवात झाली होती़ त्यामुळे सिरसट यांनी गावातील तीन गणेश मंडळांच्या अध्यक्षांसोबत गात कुटूंबियाना आर्थिक मदत देण्याबाबात चर्चा केली़यातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला़ गणेश मूर्ती स्थापना करताना कोणाताही गाजावाजा केला नाही़ यासाठी लागणारा खर्च मंडळांनी राखून ठेवला. वर्गणीतील सर्व रक्कम गात कुटूंबियांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.(प्रतिनिधी)
पोहनेर येथे मान्यवरांच्या उपस्थितत राजेभाऊ गात यांची आई रुक्मिणबाई गात व मुलीच्या नावे पन्नास हजार रुपयांची एफडी व त्यांची पत्नी जयश्री व मुलगी यांच्या नावे पन्नास हजार रुपयांची एफडी करण्यात येणार असल्याचे मंगळवारी कार्यक्रमात जाहीर झाल्यानंतर त्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले़ यावेळी आऱपी़ सिरसट, सपोनि एऩएम़ शेख, सपोनि छबु सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती़ सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष बाजीराव काळे, चक्रधर गणेश मंडळाचे अध्यक्ष बापूराव काकडे व शेतकरी गणेश मंडळाचे अध्यक्ष सतीश देशमुख यांनीही एक लाख रुपयांची मदत केली़ कार्यक्रमास उपसरपंच विष्णू रोडगे, ग्रामसभा सदस्य अनिल देशमुख, पोलीस पाटील अशोक काकडे, जलील कुरेशी, नारायण हटके, राजेंद्र देशपांडे, राजेभाऊ पवार, शिवाजी काकडे, पवन देशमुख, अजय देशमुख, मुकुंद देशमुख यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती़