हेल्मेटसक्तीमुळे दुचाकीचालक द्विधावस्थेत

By Admin | Updated: July 23, 2016 01:13 IST2016-07-23T00:22:51+5:302016-07-23T01:13:39+5:30

औरंगाबाद : रस्ते सुरक्षा आणि अपघातांना आळा घालण्यासाठी दुचाकी चालविणारे व मागे बसणाऱ्यांसह हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे.

Helmet rush due to two-wheelers | हेल्मेटसक्तीमुळे दुचाकीचालक द्विधावस्थेत

हेल्मेटसक्तीमुळे दुचाकीचालक द्विधावस्थेत

औरंगाबाद : रस्ते सुरक्षा आणि अपघातांना आळा घालण्यासाठी दुचाकी चालविणारे व मागे बसणाऱ्यांसह हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे. एवढेच नाही तर त्याशिवाय आता पेट्रोलही मिळणार नसल्याने दुचाकीचालक वैतागले आहेत. अनेकांनी ‘आता नो लिफ्ट, कारण कशाला फुकटच्या दंडात्मक पावतीचे गिफ्ट’ असे म्हटले. वयोवृद्धांनी ‘आधी रस्त्याची अवस्था सुधारा, तरच हेल्मेटसक्ती करा’ अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
रस्ते सुरक्षा समितीने मोटार वाहन कायद्याचे काटेकोर पालन करण्यासाठी दुचाकीस्वारांना हेल्मेट बंधनकारक केले आहे. दुचाकीवरील दोन्ही स्वारांनी हेल्मेट घातले नसेल, तर पेट्रोलपंपावर इंधन दिले जाणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या महिन्यात तेलंगणातील आदिलाबाद प्रशासनाने हेल्मेट नाही, त्याला पेट्रोल नाही, असे आदेश दिले. त्याचा कित्ता परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गिरविला आहे.
याविषयी शहरातील काही निवडक दुचाकीस्वारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता ते म्हणाले की, पाठीमागे बसणाऱ्यांना हेल्मेट घेणे म्हणजे पुन्हा बजेट बिघडून जाणार. तसेच कुणाला लिफ्ट देणे म्हणजे एक दुसरी हेल्मेट सोबत बाळगावी लागेल अन्यथा दंड भरावा लागेल.

Web Title: Helmet rush due to two-wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.