हेल्मेटसक्तीस मुदतवाढ

By Admin | Updated: March 16, 2016 08:29 IST2016-03-16T08:29:18+5:302016-03-16T08:29:33+5:30

नांदेड : शहरात १४ मार्चपासून लागू करण्यात आलेली हेल्मेटसक्ती आता आठ दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली़

Helmet Duration Increase | हेल्मेटसक्तीस मुदतवाढ

हेल्मेटसक्तीस मुदतवाढ

नांदेड : शहरात १४ मार्चपासून लागू करण्यात आलेली हेल्मेटसक्ती आता आठ दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली़ शहरात अचानकपणे हेल्मेटसक्तीचा नियम दाखवत दंड वसुली केली़ या मोहिमेमुळे वाहनधारकांची गैरसोय झाली़ प्रारंभी हेल्मेटसक्तीबाबत पालकमंत्री तथा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचे कोणतेही आदेश नसल्याचे सांगणाऱ्या वाहतूक शाखेने मंगळवारी मात्र घूमजाव केले़ सध्या सुरू असलेल्या परीक्षा आणि वाहनधारकांना बाजारपेठेत हेल्मेट न मिळाल्यामुळे हेल्मेटसक्तीला आठ दिवसांची पालकमंत्र्यांकडून मुदतवाढ दिल्याचे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नारनवरे यांनी सांगितले़

Web Title: Helmet Duration Increase