हॅलो ...सर, हॅलो मॅडम, वनरक्षक पदाचा कधी लागणार निकाल?
By साहेबराव हिवराळे | Updated: March 13, 2024 18:17 IST2024-03-13T18:13:39+5:302024-03-13T18:17:03+5:30
वनरक्षक पदाच्या १०,५०० उमेदवारांची वन विभागाच्या फोनवर ट्रिंग..ऽऽऽट्रिंग सुरूच

हॅलो ...सर, हॅलो मॅडम, वनरक्षक पदाचा कधी लागणार निकाल?
छत्रपती संभाजीनगर : वन विभागातील वनरक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांत लेखी, मैदानी अशा चाचण्या घेऊनही निकाल काही लागत नाही. आशेवर असलेल्या युवक-युवतींची दररोज वन विभागाला फोन करून विचारणा सुरू झाली. दररोज फोन करून अहो सर...मॅडम यादी कधी लागणार, असाच प्रश्न सुरू राहिला. अखेर सोमवारी प्राथमिक यादी ऑनलाइन जाहीर झाली असून, दोन दिवसांत शंका मांडाव्यात, असे सांगण्यात आले.
वनरक्षकपदाच्या भरतीची मैदानी चाचणी आणि सर्व परीक्षा या कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली घेण्यात आलेल्या आहेत. १५ हजार मुलांचे अर्ज आले होते त्यात चाळणी होऊन १० हजार ७०४ उमेदवार राहिले.
तर नंबर लागेल
अनेकदा फोन केल्यावर सोमवारी प्राथमिक यादी जाहीर झाली असून, त्यात स्पर्धेत मोजकेच नंबर पुढे असून, कदाचित फायनल यादीत नंबर लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-एक परीक्षार्थी
दररोज उडवाउडवीची उत्तरे..
तयारी चांगली केल्याने आणि त्यात गुणवत्तेची खात्री असल्याने मला त्यात बऱ्यापैकी स्थान मिळालेले असले तरी दोन दिवस आक्षेप नोंदविण्याची सवलत दिलेली आहे. त्यात आक्षेप नोंदविणार आहे.
- एक परीक्षार्थी
लवकरच फायनल यादी
जास्त संख्या असल्याने प्रॉपर निकाल होणे गरजेचे आहे. निवड समितीच्या निर्णयानुसार कोणतीही प्रक्रिया होत नाही. लवकरच फायनल यादी जाहीर करण्यात येणार आहे.
- एसीएफ आशा चव्हाण