महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वराकडे जाणाऱ्या ३ मार्गावरील अवजड वाहतूक ५ दिवस बंद 

By सुमित डोळे | Published: March 6, 2024 07:45 PM2024-03-06T19:45:08+5:302024-03-06T19:45:24+5:30

जड, अवजड वाहनांसाठी पाच दिवस तीन महत्वाचे मार्ग बंद राहणार

Heavy traffic on 3 routes leading to Ghrishneshwar will be closed for 5 days on the occasion of Mahashivratri | महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वराकडे जाणाऱ्या ३ मार्गावरील अवजड वाहतूक ५ दिवस बंद 

महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वराकडे जाणाऱ्या ३ मार्गावरील अवजड वाहतूक ५ दिवस बंद 

छत्रपती संभाजीनगर : वेरुळ येथील घृष्णेवर मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून जवळपास लाखो भाविक येणार असल्याने ७ ते ११ मार्च दरम्यान घृष्णेवर कडे जाणारे तीन महत्वाचे मार्ग जड, अवजड व हलक्या वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

८ मार्च रोजी सर्वत्र महाशिवरात्री उत्साहात साजरी केली जात आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वेरुळ येथील घृष्णेवर मंदिरात देखील ७ ते ११ मार्च दरम्यान महायात्रेचे आयोजन करण्यात आले असून विविध धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांचा समावेश असेल. यंदा राज्यभरातून ५ लाख भाविक येण्याची शक्यता आहे. मंदिरासह तिर्थकुंड, वेरुळ लेणी एकाच मार्गावर असल्याने पोलिसांनी ५ दिवस तीन महत्वाच्या मार्गांवरील वाहतूकीत बदल केला आहे. नागरिकांनी या दरम्यान पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक मनिष कलवानीया यांनी केले आहे.

असा असेल बदल
-छत्रपती संभाजीनगर, दौलताबाद मार्गे वेरुळ, कन्नडकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर, शेरणापुर फाटा, दौलताबाद टि पॉईंट, माळीवाडा, कसाबखेडा, वेरुळ मार्गे कन्नड कडे जातील.
-वेरुळ, खुलताबाद दौलताबाद मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येणारी वाहने वेरुळ, कसाबखेडा, माळीवाडा, दौलताबाद मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जातील.
- फुलंब्री, खुलताबाद, वेरुळ, कन्नड, धुळे कडे जाणारी वाहने फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, नगरनाका, शेरणापुर फाटा, दौलताबाद, माळीवाडा, कसाबखेडा, वेरुळ मार्गे कन्नडकडे जाईल.

Web Title: Heavy traffic on 3 routes leading to Ghrishneshwar will be closed for 5 days on the occasion of Mahashivratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.