शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे निराशा वाढली; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांनी जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 14:18 IST

अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आली असून यातून तिघांनी टोकाचे निर्णय घेतले.

दौलताबाद/बनकिन्होळा : जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आली असून, हताश तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा व गंगापूर तालुक्यातील जांभळा येथे सोमवारी तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील माळीवाडा येथे मंगळवारी उघडकीस आली. रामेश्वर पुंडलिक फरकाडे (वय ३४), जगन्नाथ रखमाजी आढाव (वय ६०) व अरुण अशोक मंजुळ (वय ३३ वर्षे) अशी मयत शेतकऱ्यांची नावे आहेत.

माळीवाडा शिवारात गट क्रमांक ६७ मध्ये जगन्नाथ आढाव यांची १ एक्कर ३७ गुंठे शेती आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील पिकाचे अतोनात नुकसान झाले. या पीक लागवडीसाठी केलेला खर्च आणि घेतलेले कर्ज कसे फेडावे, याच चिंतेत ते मानसिक तणावाखाली होते. याच तणावातून त्यांनी मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास माळीवाडा शिवारातील गट क्रमांक ५५ मधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची दौलताबाद पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.

सव्वा एकरमधील मका, कापूस हातचे गेल्याने जीवन संपविलेबनकिन्होळा : सव्वा एकर शेतात लागवड केलेला कापूस आणि मका ही पिके अतिवृष्टीने हातची गेल्याने निराश झालेल्या सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथील एका ३४ वर्षीय शेतकरी रामेश्वर पुंडलिक फरकाडे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. मृत शेतकरी रामेश्वर फरकाडे यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी ६:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. रामेश्वर यांचे एक ते दीड वर्षापूर्वीच लग्न झाले होते. या घटनेची नोंद वडोद बाजार पोलिस ठाण्यात झाली आहे.

जाभांळा येथे मध्यरात्री उठून घेतला गळफास

गंगापूर तालुक्यातील जाभांळा येथील शेतकरी अरुण अशोक मंजुळ यांच्या आईच्या नावाने खडकनारळा व वसुसायगाव शिवारात गट नं. १११ व १३१ मध्ये पाच एकर शेती आहे. त्यात त्यांनी यंदा कापूस व तूर लावली होती. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने त्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. कर्ज काढून, उसणवारी करून खरिपात लागवड केली आणि आता हातचे पिकही गेले, असे म्हणून अरूण मंजूळ हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्येत होते. यातूनच त्यांनी सोमवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास राहत्या घरात पत्र्याच्या लोखंडी ॲंगलला साडीने गळफास घेतला. साडीचा पदर तुटल्याने अरूण मंजुळ हे खाली पडल्याने आवाज ऐकूण त्यांच्या आईने खोलीत डोकावून पाहिले असता त्यांना अरूण हे पडलेले आणि लोखंडी ॲगलला साडी दिसली. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर नातेवाईक जमा झाले. त्यांनी अरूण यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. अरुण मंजुळ यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद दौलताबाद पोलिस ठाण्यात करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Crop Loss Leads to Farmer Suicides in Chhatrapati Sambhajinagar

Web Summary : Distressed by crop losses due to heavy rains, three farmers in Chhatrapati Sambhajinagar district ended their lives. The farmers, burdened by debt and crop failure, took the extreme step in separate incidents across Sillod and Gangapur talukas.
टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAgriculture Sectorशेती क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर