शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
5
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
6
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
7
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
8
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
9
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
10
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
11
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
12
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
13
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
14
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
15
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
16
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
17
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
19
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
20
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री

अतिवृष्टीचा फटका! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्यावी लागेल २३४ कोटींची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 13:59 IST

अतिवृष्टीने एकूण १ लाख ५६ हजार ४२९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर : सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार ४२९ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांसह फळपिकांना फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून २ लाख ५७ हजार ३०५ बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी २३४ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.

याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांना सादर केला असून मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यातील प्राप्त अहवाल एकत्रित करुन नुकसानभरपाईसाठी निधी मागणी अहवाल शासनाकडे सादर होईल. अतिवृष्टीमुळे १ लाख ४६ हजार ८३८ हेक्टरवरील जिरायती क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले. यासह २२ हेक्टरवरील बागायत तर ९ हजार ५६८ हेक्टरवरील फळपिकांना फटका बसला.

एकूण १ लाख ५६ हजार ४२९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. जिरायत क्षेत्रातील नुकसानभरपाईसाठी १९९ कोटी ७० लाख रुपये, बागायत क्षेत्रासाठी ५ लाख ९४ हजार रुपये तर फळपीक क्षेत्रासाठी ३४ कोटी ४४ लाख ७६ हजार ४४० रुपयांचा निधीची गरज असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.

तालुका             – बाधित शेतकरी - बाधित क्षेत्र - अपेक्षित निधीछत्रपती संभाजीनगर – ५०४९             - ४२९६.७९ - १५ कोटीपैठण             – ९४१५५             - ५०७९०             - ७१ कोटीफुलंब्री             – १०५                         - ६९.०७             - ९३ लाखगंगापूर             – ३०७६१             - २२४८९             - ३१ कोटीखुलताबाद             – १२५५१             - ८३४६             - ११ कोटीसिल्लोड             – ७९१२०             - ५०१४७             - ६८ कोटीकन्नड                         – २५७६             - ८०२             - ११कोटी            सोयगाव             – ३२९८८             - १९४८९.१७ - २६ कोटीएकूण                         - २५७३०५             - १५६४२९.०३ - २३४ कोटी

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसFarmerशेतकरी