शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

मराठवाड्यात अतिवृष्टीचे सत्र सुरूच; पिकांचे नुकसान १७ लाख हेक्टवर, शेतकरी हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 19:53 IST

मराठवाड्याच्या ८ जिल्ह्यांत जून, जुलै व ऑगस्ट या ३ महिन्यांमध्ये सरासरी ५१३.५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. त्या तुलनेत ५८१.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात परतीचा पाऊस जोरदार हजेरी लावत असून, अतिवृष्टीचे सत्र सुरूच आहे. ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा दीडपट पाऊस झाला तर सप्टेंबरमध्ये पावसाने दाणादाण उडवून दिली आहे.

दरम्यान, १८ सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत धाराशिव, नांदेड जिल्ह्यांत प्रत्येकी २ तर परभणी जिल्ह्यात एक अशा पाच मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. मराठवाड्याच्या ८ जिल्ह्यांत जून, जुलै व ऑगस्ट या ३ महिन्यांमध्ये सरासरी ५१३.५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. त्या तुलनेत ५८१.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर १८ सप्टेंबरपर्यंत परतीच्या पावसाने सरासरी ओलांडली आहे. विभागातील ८ जिल्ह्यांत या तारखेपर्यंत जूनपासून ६१३.१ मिलिमीटर सरासरी पाऊस अपेक्षित होता त्या तुलनेत ७२७.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

पिकांचे नुकसान १७ लाख हेक्टरवरमराठवाड्यात खरीप हंगामातील पिकांचे नुकसान १७ लाख हेक्टरवर गेल्याचा अंदाज असून, पंचनामे सध्या सुरू आहेत.

जिल्हानिहाय अपेक्षित व झालेला पाऊसछत्रपती संभाजीनगर : पाऊस अपेक्षित ५२१.५ मिमी, झालेला : ६११.१ मिमीजालना : पाऊस अपेक्षित ५४६.४ मिमी, झालेला : ६८१.६ मिमीबीड : पाऊस अपेक्षित ४९७.३ मिमी, झालेला : ६४१.६ मिमीलातूर : पाऊस अपेक्षित ६३३.६ मिमी, झालेला : ६८४.४ मिमीधाराशिव : पाऊस अपेक्षित ५२९.२ मिमी, झालेला : ६६०.८ मिमीनांदेड : पाऊस अपेक्षित ७४७.४ मिमी, झालेला : ९५३.८ मिमीपरभणी : पाऊस अपेक्षित ६९३.७ मिमी, झालेला : ७१५.६ मिमीहिंगोली : पाऊस अपेक्षित ७३३.४ मिमी, झालेला : ८८९.७ मिमी

विभागातील मंडळात अतिवृष्टीनांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील मटूळ मंडलात ७० मिलिमीटर, उमरी तालुक्यातील सिंधी मंडलात ८३.२५, धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग ६५.५० व जळकोट मंडलात ८८ मिलिमीटर तर परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील बामनी मंडलात ९४.५० मिलिमीटर पाऊस बरसला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRainपाऊसMarathwadaमराठवाडा