शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीचा मराठवाड्यातील एमआयडीसींनाही फटका, पाणी शिरल्याने अनेक कंपन्यांतील काम ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 19:43 IST

पंधरा दिवसांपासून मराठवाड्यात पाऊस सुरू आहे. औद्योगिक वसाहतींमध्येही अतिवृष्टीमुळे समस्या निर्माण झाल्या.

छत्रपती संभाजीनगर : पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मराठवाड्यातील औद्योगिक वसाहतींनाही बसला. शनिवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे वाळूज एमआयडीसीतील अनेक कंपन्यांमध्ये पाणी शिरल्याने कंपन्यांचे कामकाज ठप्प झाले.

पंधरा दिवसांपासून मराठवाड्यात पाऊस सुरू आहे. औद्योगिक वसाहतींमध्येही अतिवृष्टीमुळे समस्या निर्माण झाल्या. याविषयीच्या तक्रारी संबंधित कंपन्यांकडून एमआयडीसी प्रशासनाकडे येत आहेत. २२ आणि २३ सप्टेंबर रोजी पैठण मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसाचा फटका पैठण औद्योगिक वसाहतीमधील पाच कंपन्यांना बसला. तेथील मे. मॅट्रिक्स लाइफ सायन्स कंपनीच्या पार्किंगमध्ये पाणी साचले होते. तेथे पाणी वाहून जाण्यासाठी नाला रुंदीकरण गरजेचे आहे. याच वसाहतीमधील हिंदुस्थान कंपोजिट कंपनीत पावसाचे पाणी शिरले.

मीनाक्षी ॲग्रो इंडस्ट्रीत पाणी शिरल्याने कामगारांना गैरसोयीचा सामना करावा लागला. महेश इंडस्ट्रीजमध्येही गुरुवारी पाणी शिरल्याने कागदी पुठ्ठ्याच्या मालाचे नुकसान झाल्याची माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. राज बोर्डे मिल कंपनीत पाणी शिरल्याने मालाचे नुकसान झाले. जालना येथे अतिरिक्त टप्पा १ औद्योगिक क्षेत्रातील दोन विद्युत ट्रान्सफाॅर्मर जळाले. टप्पा २ एमआयडीसीतील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. नांदेड एमआयडीसीतील पालदेवार प्रशांत ॲग्रो टेक कंपनीत पाणी शिरल्याने कंपनीचे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. धाराशिव जिल्ह्यातील भूम औद्योगिक वसाहतीमधील जय किसान इंडस्ट्रीजसमोरील मुरमाचा भराव पावसामुळे वाहून गेला. तेथे पक्की नाली बांधण्याची मागणी कंपनीचालकाने केली आहे. कळंब औद्योगिक वसाहतीमधील यश फेब्रिकेशन कंपनीलगतच्या मुरमाचा भरावही वाहून गेला आहे.

वाळूज एमआयडीसीतील रस्त्यांसाठी १६ कोटीअतिवृष्टीमुळे विविध एमआयडीसीतील रस्त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एमआयडीसी प्रशासनाने याबाबतची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांना छत्रपती संभाजीनगरच्या बैठकीत दिली. तेव्हा, रस्त्यांसाठी १६ कोटी रुपयांचा निधी त्यांनी तातडीने मंजूर केला.

वाळूज एमआयडीसीतील ए सेक्टरला अतिवृष्टीचे पाणीशनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका वाळूज एमआयडीसीतील 'ए' सेक्टर ला बसला. या सेक्टरमधील रस्त्यालगत खोदण्यात आलेल्या नाल्यांची कामे अर्धवट सोडण्यात आली. परिणामी, पावसाचे पाणी रस्त्यावरून १५ ते २० कंपन्यांमध्ये शिरले. मुसळधार पावसाचा अलर्ट असल्याने आज २५ ते३० टक्के कामगारांनी कामावर येण्याचे टाळले. ज्या कंपन्यातील कामगार स्वत:च्या वाहनांनी ये- जा करतात, त्यांना कंपनीच्या वाहनातून घरी नेऊन सोडावे लागत आहे. याचा परिणाम उत्पादनावर झाला.- डॉ. शिवाजी कान्हेरे, उद्योजक.

English
हिंदी सारांश
Web Title : Heavy Rains Disrupt Marathwada's MIDC Industries; Production Halts

Web Summary : Heavy rains severely impacted Marathwada's MIDC, flooding factories and halting production. Several companies reported significant losses, infrastructure damage, and worker difficulties. Financial aid has been approved for road repairs.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRainपाऊसMIDCएमआयडीसी