पळसवाडी शिवारात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:05 IST2021-05-28T04:05:27+5:302021-05-28T04:05:27+5:30
खुलताबाद : तालुक्यातील पळसवाडी शिवारात गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. त्यातच येथून गेलेल्या ...

पळसवाडी शिवारात जोरदार पाऊस
खुलताबाद : तालुक्यातील पळसवाडी शिवारात गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. त्यातच येथून गेलेल्या धुळे-सोलापूर महामार्गाच्या पुलावरील पाणी लगतच्या घरांमध्ये घुसल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुलाचे बांधकामच बोगस झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
काही महिन्यांपूर्वीच पळसवाडी येथील पुलाचे काम झाले होते. तोच पंधरा दिवसांपूर्वी या पुलाला मोठा खड्डा पडला. त्यातच गुरुवारी झालेल्या पावसाने पुलावरील पाण्याने आजूबाजूच्या कुटुंबीयांची दाणादाण उडाली. यात बशीर दगडू शेख, सय्यद कासमभाई जमरोद्दीन, नसीर खान बशीर खान, चंदू शेख, हमीद शहा यांच्या घरात पाणी घुसले आहे. अन्नधान्यासह संसारोपयोगी साहित्यांचे नुकसान झाले. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच असा प्रकार घडला. तर आगामी काळात सतत पाऊस राहिला तर आम्ही जगायचे तरी कसे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
---
आंदोलनाचा दिला इशारा
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांनी या पुलाची त्वरित दुरुस्ती करावी, नसता आंदोलन केले जाईल, असा इशारा पंचायत समितीचे उपसभापती युवराज ठेंगडे, सरपंच भेंडे, उपसरपंच सोमीनाथ ठेंगडे, सुधाकर दहीगाव व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी दिला आहे.
----
फोटो : पळसवाडी येथील नागरिकांच्या घरात पुलावरील पाणी घुसल्याने झालेले नुकसान.