शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील १६४ मंडळांत अतिवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 07:14 IST

मुसळधार पावसामुळे तीन जिल्ह्यांतील पिके धोक्यात

औरंगाबाद : मराठवाड्यातील १६४ मंडळांमध्ये १०० मि.मी.,पेक्षा जास्तीचा पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होण्याचे संकट उभे राहिले आहे. तीन जिल्ह्यांतील पिके अतिरिक्त पावसामुळे धोक्यात आली असून, काही जिल्ह्यांमध्ये अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे. १६ आॅगस्टपासून सुरू झालेल्या पावसामुळे हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांतील खरीप हंगामातील पिकांचा नाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.हिंगोलीतील ३० पैकी १९ मंडळांत १०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे त्या मंडळांतर्गत येणाऱ्या खरीप पिकांची शेती पाण्याखाली आली आहे. परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी १३ मंडळांत पावसाने हाहाकार उडविला आहे, तर नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ५० मंडळांत १०० मि.मी. पेक्षा जास्तीचा पाऊस झाल्यामुळे तेथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला विभागीय प्रशासनाने आदेश दिले आहेत.औरंगाबादमधील ६५पैैकी १६ मंडळांत जालन्यातील ४९ पैकी १९ मंडळांत १०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या दोन्ही जिल्ह्यांत पावसाची अपेक्षा असून खरीप हंगामाच्या पिकांना त्याची गरज आहे. बीडमधील ६३ पैकी १७ मंडळांत अतिवृष्टी नोंदविली गेली आहे, तर लातूरमधील ५३ पैकी २२ आणि उस्मानाबादमधील ४२ पैकी ८ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे ५ जिल्ह्यांत खरीप हंगामाला पावसाची गरज आहे. आजवर ५९ टक्के पावसाची नोंद मराठवाड्यात झाली आहे.खरीप हंगामात ९ हजार कोटींची गुंतवणूकमराठवाड्याचे खरीप पिकांखालील क्षेत्र ४९ लाख ११ हजार हेक्टर असून, त्यापैकी ४४ लाख १९ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. हेक्टरनिहाय पीकपेरणीच्या खर्च सूत्रानुसार अंदाज बांधला, तर खरीप हंगामात नांगरणी, पेरणी, मजुरी, बियाणे, खतांच्या खरेदीसाठी करण्यात आलेली अंदाजे ९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद