शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:32 IST

पावसाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यात मुसळधार पावसाचे आगमन झाले नव्हते; पण मंगळवारी रात्री

रात्रभर मुसळधार : सात गावांचा संपर्क तुटला, तीन रस्ते बंद लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पावसाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यात मुसळधार पावसाचे आगमन झाले नव्हते; पण मंगळवारी रात्री कोसळलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले ओसंडून वाहू लागले. रात्रभर आलेल्या पावसामुळे चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे सात गावांचा संपर्क तुटला होता. सोनेगावचा रस्ता वाहून गेला तर अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने वीज पुरवठा ठप्प झाला होता. मंगळवारी रात्री जिल्ह्यात ५०१.८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यात चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. यात सर्वाधिक पाऊस हिंगणघाट तालुक्यात १०५.२० मिमी झाला. समुद्रपूर तालुक्यात ९८ मिमी, देवळी ७२ मिमी तर वर्धा तालुक्यात ६५.८० मिमी पावसाची नोंद झाली. शिवाय सेलू तालुक्यात ६२ मिमी, आर्वी ३६ मिमी, आष्टी (श.) ३३.२० मिमी तर कारंजा तालुक्यात २९.६० मिमी पावसाची नोंद झाली. संततधार पावसामुळे यशोदा नदीला पूर आला. या पुरामुळे वायगाव-राळेगाव मुख्य मार्गावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत होते. यामुळे सरूळ, चना (टाकळी), सोनेगाव (बाई), आलोडा, बोरगाव, निमसडा, पात्री, ममदापूर या गावांसह अन्य गावांचा संपर्क तुटला होता. पुलावरून पाणी असल्याने राळेगाव-वर्धा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. नदीला लागून असलेल्या नाल्याच्या पाण्यामुळे चना (टाकळी) येथील पूल वाहून गेला. यामुळे ग्रामस्थांना गावातच अडकून पडावे लागले. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता; पण प्रारंभी पावसाने हुलकावणी दिली. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना मोड आल्याने दुबार, तिबार पेरणी करावी लागली. यानंतर बऱ्यापैकी पाऊस आल्याने शेतकऱ्यांची पिके बचावली. जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नव्हता. मंगळवारी रात्री मात्र जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाचे आगमन झाले. रात्री ११ वाजतापासून सकाळपर्यंत संततधार पाऊस सुरू होता. परिणामी, जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी साचले असून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.