‘व्हिप’ डावलणाऱ्यांची २९ रोजी सुनावणी
By Admin | Updated: November 16, 2014 00:37 IST2014-11-16T00:13:32+5:302014-11-16T00:37:42+5:30
बीड : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांना ‘व्हिप’ बजावला होता. मात्र,

‘व्हिप’ डावलणाऱ्यांची २९ रोजी सुनावणी
बीड : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांना ‘व्हिप’ बजावला होता. मात्र, त्याआधीच भाजपाचा तंबू गाठलेल्या सहा सदस्यांनी ‘व्हिप’ डावलला होता. व्हिप डावलणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राकाँने यापुर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे.
२१ सप्टेंबर २०१४ रोजी जिल्हा परिषदेत अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली होती. युती व आघाडीकडे समसमान २९ असे संख्याबळ होते. त्यामुळे निवडी अतिशय अटीतटीच्या होत्या. राष्ट्रवादीच्या वतीने घड्याळ चिन्हावर जिल्हा परिषदेत धडक मारणाऱ्या सर्वच सदस्यांना ‘व्हिप’ बजावला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या सहा सदस्यांनी राकाँ चा ‘व्हिप’ धुडकावत युतीलाच साथ दिली. यामध्ये बापूराव धोंडे, उद्धव दरेकर, जयश्री मस्के, अर्चना आडसकर, कविता म्हेत्रे, भाग्यश्री गालफाडे यांचा समावेश आहे.राकाँच्या तक्रारीवरून या बाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली असून संबंधीत जि. प. सदस्यांचे सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची देखील मागणी राकॉ ने केली होती. (प्रतिनिधी)