‘त्या’ शिक्षकाची आज आयुक्तांसमोर सुनावणी

By Admin | Updated: January 20, 2017 00:12 IST2017-01-20T00:10:28+5:302017-01-20T00:12:30+5:30

बीड : मूळ यादीत समावेश नसलेल्या एका शिक्षकाची शुक्रवारी औरंगाबाद येथे अपर आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे.

Hearing that 'teacher' today in front of commissioner | ‘त्या’ शिक्षकाची आज आयुक्तांसमोर सुनावणी

‘त्या’ शिक्षकाची आज आयुक्तांसमोर सुनावणी

बीड : मूळ यादीत समावेश नसलेल्या एका शिक्षकाची शुक्रवारी औरंगाबाद येथे अपर आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे.
कृष्णा शिवाजी अंडिल असे या शिक्षकाचे नाव असून, ते फकीर जवळा (ता. धारूर) येथील जि.प. शाळेत कार्यरत आहेत. मूळ वस्तीशाळा शिक्षक असलेले अंडिल सध्या नियमित शिक्षक म्हणून सेवा बजावीत आहेत. मूळ वस्तीशाळा शिक्षकांच्या यादीतील सहापैकी तिघांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली आहे.
उर्वरितांपैकी अंडिल यांची महिनाभरापूर्वी चौकशी करण्यात आली होती; मात्र त्यांना जि.प. सी.ई.ओंनी नोटीस बजावण्यापूर्वीच त्यांनी अपर आयुक्तांकडे अपील दाखल केले. त्यावर शुक्रवारी दुपारी ३ वाजता सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hearing that 'teacher' today in front of commissioner