पुष्पनगरी भूखंड घोटाळ्याची सुनावणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:17 IST2017-08-10T00:17:35+5:302017-08-10T00:17:35+5:30

पुष्पनगरी येथील भूखंडाचे वाढीव क्षेत्र दाखवून केलेल्या फसवणूक प्रकरणाच्या सुनावणीस मुख्य न्यायदंडाधिकारी पी.बी. पवार यांच्या न्यायालयात सुरुवात झाली

 Hearing of Pushpagani plot scandal | पुष्पनगरी भूखंड घोटाळ्याची सुनावणी सुरू

पुष्पनगरी भूखंड घोटाळ्याची सुनावणी सुरू

औरंगाबाद : पुष्पनगरी येथील भूखंडाचे वाढीव क्षेत्र दाखवून केलेल्या फसवणूक प्रकरणाच्या सुनावणीस मुख्य न्यायदंडाधिकारी पी.बी. पवार यांच्या न्यायालयात सुरुवात झाली. पुढील सुनावणी १९ आॅगस्ट रोजी होणार आहे. तीन हजार चौरस फुटांचा भूखंड (सिटी सर्व्हे क्रमांक २०७२२) स्वत:चा आहे, असे भासवून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा माजी उपाध्यक्ष तथा आरोपी जयराम साळुंके यांनी हा भूखंड शैक्षणिक उपक्रमासाठी मनपाला दिला. साळुंके यांनी अधिकारी व कर्मचाºयांशी संगनमत करून भूखंड हा तीन हजार ऐवजी पाच हजार चौरस फुटांचा दाखविला. भूसंपादनापोटी महापालिकेने साळुंके यांना २३ लाख ४८ हजार ३९३ रुपये दिले. याप्रकरणी अनेक तक्रारी आल्यानंतर महापालिकेने या प्रकरणाची चौकशी केली. साळुंकेसह महापालिकेचे कनिष्ठ अभियंता मोहंमद फईम आणि गायकवाड व कर्मचारी कपाळे यांनी फसवणूक केल्याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा रद्द करावा म्हणून आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Web Title:  Hearing of Pushpagani plot scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.