जॉन्सन अॅण्ड जॉन्सन व ‘लोकमत’तर्फे हेल्दी बेबी कॅम्प
By Admin | Updated: August 4, 2016 00:38 IST2016-08-04T00:36:46+5:302016-08-04T00:38:14+5:30
औरंगाबाद : हेल्दी बेबी कॅम्प ही एक जागृत करणारी संकल्पना असून जॉन्सन अॅण्ड जॉन्सन व लोकमत एका भव्य कॅम्पचे आयोजन करीत आहे.

जॉन्सन अॅण्ड जॉन्सन व ‘लोकमत’तर्फे हेल्दी बेबी कॅम्प
औरंगाबाद : हेल्दी बेबी कॅम्प ही एक जागृत करणारी संकल्पना असून जॉन्सन अॅण्ड जॉन्सन व लोकमत एका भव्य कॅम्पचे आयोजन करीत आहे. सुदृढ निरोगी बाळ हे प्रत्येक माता-पित्याचे स्वप्न असते.
सशक्त व स्वस्थ मुले, निरोगी कुटुंब, जाणकार समाज आणि समृद्ध भारत अशा टप्प्याटप्प्याने विकसित होणारी आपली संस्कृती आणि त्यात घडविणे ही मोठी जबाबदारी जॉन्सन अॅण्ड जॉन्सन या भारतातील सर्वाधिक मातांचा लाडका ब्रँड आणि आपली सामाजिक बांधिलकी जपत जपत क्रांती घडविणारे वृत्तपत्र म्हणजे ‘लोकमत’ यांनी या दृष्टीने हे पाऊल उचलून एक वेगळी संकल्पना ठेवली आहे. १०० वर्षांपेक्षाही अधिक काळापासून जॉन्सन बेबी हे बाळाच्या सुश्रुषा विज्ञानामध्ये आघाडीवर राहिले आहे. हा वारसा प्रदीर्घ आहे. ज्यातून पिढी दर पिढी प्रत्येक पालकाने बाळाला दिलेला विश्वासाचा स्पर्श आहे. असा स्पर्श; जो जोपासतो बाळाचे आरोग्य, बाळाचे निरोगीपण आणि मातापित्यांचा अतूट विश्वास. आणि म्हणूनच जॉन्सनचे उत्पादन आईच्या मातृत्वावर आणि विज्ञानाच्या आधारावर निर्माण करण्यात आले आहेत. जॉन्सन अॅण्ड जॉन्सन आणि लोकमत वृत्तपत्र समूहाने आयोजित केलेला हा कॅम्प एका निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न होय. या कार्यक्रमात सहभागी होऊन जागरूक पालकांची भूमिका निभावण्याची संधी या निमित्ताने जॉन्सन अॅण्ड जॉन्सन व लोकमत यांनी दिली आहे. आयएपी ही भारतातील बालरोग चिकित्सकांची सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे, जी आरोग्याच्या सुधारणेसाठी सतत झटत असते.
नाव नोंदणीसाठी संपर्क साधा...
लोकमत हॉल, लोकमत भवन, जालना रोड येथे एकूण तीन गटांत हा कॅम्प घेण्यात येणार आहे. ०- १ वर्ष, १- ३ वर्षे, ३- ५ वर्षे असे तीन गट करण्यात आले आहेत. सर्व कॅम्पमधील बाळांचा जन्म दाखला, वयाचा पुरावा, वैद्यकीय उपचार व लसीकरणाची कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. ७ आॅगस्ट रोजी स. ९ वा. सदर कॅम्प घेण्यात येईल. पालकांनी नावनोंदणीसाठी या ७७०९५२४५६० क्रमांकावर स. ११ ते सायं. ५ या वेळेत संपर्क करावा.