आरोग्यमंत्र्यांनी थांबवली ‘मिनी घाटी’ची ‘ओपीडी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:56 IST2017-10-11T00:56:42+5:302017-10-11T00:56:42+5:30
चिकलठाणा येथील मिनी घाटी म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयात कोणत्याही राजकीय समारंभाशिवाय बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा प्रयत्न आरोग्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून थांबविला

आरोग्यमंत्र्यांनी थांबवली ‘मिनी घाटी’ची ‘ओपीडी’
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : चिकलठाणा येथील मिनी घाटी म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयात कोणत्याही राजकीय समारंभाशिवाय बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा प्रयत्न आरोग्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून थांबविला. या ठिकाणी केवळ बाहरुग्ण विभाग सुरू करण्याऐवजी रीतसर उद््घाटन करून सर्व सेवा एकदाच सुरू केल्या जातील, असे म्हणून आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या अधिका-यांचे तोंड बंद केल्याचे समजते.
सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचा ३ आॅक्टोबर रोजी आरोग्य विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ताबा घेतला. या ठिकाणी १० आॅक्टोबरपूर्वी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याची तयारी आरोग्य विभागाने केली. नाशिक कुंभमेळ्यासाठी घेतलेल्या ८० खाटा रुग्णालयास मिळाल्या आहेत. आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत ६० लाखांचे उपचार साहित्य खरेदी करण्यात आले. औषधीसाठाही दाखल झाला आहे.