आरोग्य विभागाने मांडले ठाण
By Admin | Updated: July 30, 2014 00:48 IST2014-07-29T23:55:13+5:302014-07-30T00:48:25+5:30
गंगाखेड:तालुक्यातील खळी येथे डेंग्यूसदृश्य आजाराची दहा जणांना लागण झाली असून, त्यापैकी चार जणांचे रक्ताचे नमुने परभणी येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़
आरोग्य विभागाने मांडले ठाण
गंगाखेड:तालुक्यातील खळी येथे डेंग्यूसदृश्य आजाराची दहा जणांना लागण झाली असून, त्यापैकी चार जणांचे रक्ताचे नमुने परभणी येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़ या गावात गेल्या सहा दिवसांपासून आरोग्य विभागाच्या पथकाने ठाण मांडले आहे़
खळी या जवळपास १८०० लोकसंख्या असलेल्या गावामध्ये डेंग्यूसदृश्य तापाच्या आजाराची गेल्या दहा दिवसांपासून साथ पसरली आहे़ गावातील दहा जणांना या आजाराची लागण झाली़ त्यापैकी चार जणांचे रक्ताचे नमुने आरोग्य विभागाच्या पथकाने परभणी येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत़ गेल्या सहा दिवसांपासून आरोग्य विभागाचे पथक येथे ठाण मांडून आहे़ या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खळी येथील तापीची साथ आटोक्यात आली असल्याचा दावा केला़ येथे स्वच्छतेसंदर्भात जनजागृती अभियान राबविण्यात आले असून, कोरडा दिवस पाळण्याचे ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले़ गावातील तापीची साथ पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत आरोग्य विभागाचे पथक तेथे कार्यरत राहणार असल्याचे डॉ़ बिराजदार म्हणाले़ (प्रतिनिधी)
गेल्यावर्षी जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. आरोग्य विभागाने पावसाळ्यापूर्वीच डेंग्यूची साथ येऊ नये म्हणून उपाययोजना करणे गरजेचे होते मात्र आरोग्य प्रशासन कागदोपत्रीच उपाययोजना करीत आहे.