‘फ्लोराईड’ सर्वेबाबत आरोग्य विभाग उदासीन

By Admin | Updated: December 19, 2014 00:58 IST2014-12-19T00:34:34+5:302014-12-19T00:58:12+5:30

बीड : जिल्ह्यात फ्लोराईडने हातपाय पसरलेले असताना आरोग्य विभागाकडे मात्र रुग्णांच्या सर्वेक्षणासाठीही वेळ नाही. १०२१ ग्रामपंचायतींपैकी केवळ १८ गावांतच सर्वे करण्यात आला.

Health Department nullifies the 'fluoride' survey | ‘फ्लोराईड’ सर्वेबाबत आरोग्य विभाग उदासीन

‘फ्लोराईड’ सर्वेबाबत आरोग्य विभाग उदासीन


बीड : जिल्ह्यात फ्लोराईडने हातपाय पसरलेले असताना आरोग्य विभागाकडे मात्र रुग्णांच्या सर्वेक्षणासाठीही वेळ नाही. १०२१ ग्रामपंचायतींपैकी केवळ १८ गावांतच सर्वे करण्यात आला. त्यामुळे फ्लोराईडबाधित रुग्णांचा आकडाही मोठा असण्याची भीती आहे. नियंत्रण कार्यक्रमासाठी नेमलेल्या चार कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाने वाऱ्यावर सोडल्याने सर्वेचे काम ठप्प आहे.
आरोग्य विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी २०१३ मध्ये फ्लोराईडचा सर्वे केला़ हा सर्वे केवळ १८ गावांमध्ये करून सोपस्कार पार पाडण्यात आले़ जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १०२१ ग्रामपंचायतींमध्ये सर्वे होणे आवश्यक आहे़ त्याशिवाय किती रूग्ण फ्लोराईडबाधित आहेत हे कळणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्य माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष किशोर राऊत यांनी व्यक्त केली़ जबाबदारी निश्चित करून फ्लोराईडला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस पाऊले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली़
मार्गदर्शन मागवू
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे म्हणाले, फ्लोराईड नियंत्रण कार्यक्रम गतिमान करण्यासाठी शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात येईल़४
आरोग्य सहसंचालकांनी खास फ्लोराईड नियंत्रणासाठी चार कर्मचारी एप्रिल २०१३ मध्ये कंत्राटी स्वरूपात नियुक्त केले होते़
४प्रयोगशाळा तंत्रज्ञ आऱ एस़ मिसाळ, क्षेत्रीय अन्वेषक एस़ आऱ नारायणकर, जी़ डी़ कापरे, ए़ एस़ थोरात यांचा समावेश होता़
४मात्र सहा महिन्यानंतर त्यांना पुन्हा नव्याने रुजू आदेश दिले नाही़ त्यामुळे सर्वेचे काम ठप्प आहे़ शिवाय कर्मचाऱ्यांचा रोजगारही हिरावला आहे़

Web Title: Health Department nullifies the 'fluoride' survey