‘त्या’ आरोग्य केंद्राची चौकशी

By Admin | Updated: May 14, 2014 23:53 IST2014-05-14T23:45:05+5:302014-05-14T23:53:46+5:30

कापडसिंगी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व अधिकारी नेहमीच गैरहजर असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.

The 'Health Center' inquiry | ‘त्या’ आरोग्य केंद्राची चौकशी

‘त्या’ आरोग्य केंद्राची चौकशी

 कापडसिंगी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व अधिकारी नेहमीच गैरहजर असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. त्यात आरोग्य केंद्रात वैैद्यकीय अधिकारी गायब असल्याचे वृत्त ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध झाल्याने त्याची दखल घेण्यात आली. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे यांनी याबाबत तत्काळ चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. सीईओंच्या आदेशानुसार तालुका आरोग्य अधिकारी नामदेव कोरडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची चौकशी करून कर्मचार्‍यांना कर्तव्यावर हजर नसल्याबद्दल नोटीस देऊन लेखी खुलासा मागितला; पण तालुका आरोग्य अधिकार्‍यांच्या उपस्थितीतही दोन्ही वैैद्यकीय अधिकारी हजर नव्हते हे विशेष होय. कापडसिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या अनागोंदी कारभाराला ग्रामस्थ चांगलेच वैैतागले होते. येथे नेहमीच कर्मचारी हजर नसतात. वैैद्यकीय अधिकारी हजर राहत नाहीत. रुग्णांना पिण्याचे पाणी नाही. तर येथे फ्रीज नसल्यामुळे कुठलीच औषधी व आरोग्य सेवा वेळेवर मिळत नाही. येथील ग्रामस्थांनी लेखी तक्रार सुद्धा तालुका आरोग्य अधिकार्‍यांकडे केली. तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. नामदेव कोरडे यांनी जलस्वराज्य योजनेतून प्राथमिक आरोग्य केंद्रास तत्काळ पाणीपुरवठा सुरू केला व हातपंप दुरूस्ती साठीही नियोजन केले जााणार असल्याचे सांगितले. अत्यावश्यक रुग्ण रेफर करण्यासाठी कापडसिंगी केंद्रांतर्गत अतिरिक्त रुग्णवाहिका दाखल झाली असून तिचा १०८ हा नंबर डायल केल्यास २० मिनिटात रुग्णवाहिका मिळेल. प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याची मागणी केली जाणार आहे. त्या दोन्ही गैरहजर वैैद्यकीय अधिकार्‍यांची चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठांना पाठवून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे डॉ. कोरडे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: The 'Health Center' inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.