धावताना खालावली उमेदवाराची प्रकृती
By Admin | Updated: June 26, 2014 00:38 IST2014-06-26T00:28:20+5:302014-06-26T00:38:54+5:30
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठातील मैदानावर पोलिस भरती प्रक्रिया सुरू आहे़ बुधवारी सकाळी ७ वाजता उमेदवारांची धावण्याची चाचणी घेण्यात आली़
धावताना खालावली उमेदवाराची प्रकृती
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठातील मैदानावर पोलिस भरती प्रक्रिया सुरू आहे़ बुधवारी सकाळी ७ वाजता उमेदवारांची धावण्याची चाचणी घेण्यात आली़ यावेळी एका उमेदवारांच्या पोटात दुखू लागल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले़
दहा ते पंधरा दिवसांपासून परभणी येथे पोलिस भरती प्रक्रिया सुरू आहे़ यामध्ये उमेदवारांना गोळा फेकसह मैदानी चाचणी घेण्यात येत आहे़ शहरातील पोलिस मुख्यालय मैदान व वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ मैदानावर उमेदवारांची चाचणी घेण्यात येत आहे़
विद्यापीठ मैदानावर बुधवारी सकाळी ७ वाजता धावण्याची चाचणी घेण्यात आली़ यावेळी औंढा तालुक्यातील विकास श्रीधर गायकवाड (वय २४) हा धावणे झाल्यानंतर अचानक छातीत व पोटात दुखू लागले़ हे येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले़ त्यानंतर येथील डॉक्टरांनी तात्काळ विकासवर प्राथमिक उपचार करून रुग्णावाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, त्याला अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले आहे़ त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे़ घटनास्थळी डॉक्टराचे पथक असल्यामुळे उमेदवारांवर तत्काळ उपचार केले जात आहेत़ (प्रतिनिधी)
पाच डॉक्टरांचे पथक
राज्यात पोलिस भरती प्रक्रिया सुरू आहे़ भरतीच्या वेळी तीन ते चार उमेदवारांना राज्यात आपला जीव गमवावा लागला आहे़ या घटनेची परभणीत पुर्नरावृत्ती होऊ नये म्हणून जिल्हा रुग्णालयातील ५ डॉक्टरांच्या पथकासह दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती डॉ़ प्रकाश डाके यांनी दिली़