शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

घराघरांतून लोखंडी कढई-तवा ‘हद्दपार’; ॲनिमिया होण्याचा धोकाही वाढतोय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 19:38 IST

आरोग्यासाठी साखरेपेक्षा 'लोह' महत्त्वाचे; नॉनस्टिकचा मोह पडतोय महागात.

छत्रपती संभाजीनगर : एकेकाळी घराघरांत हमखास दिसणारी लोखंडी कढई, लोखंडी तवा अनेक स्वयंपाकघरांतून जवळपास हद्दपार झाली आहेत. त्याजागी नॉनस्टिक, स्टीलच्या भांड्यांचा वापर वाढला. मात्र यामुळे अन्नातून मिळणाऱ्या नैसर्गिक लोहाचा स्रोत कमी झाला असून, पंडुरोगाचा (ॲनिमिया) धोका वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे ‘लोखंडी कढई-तवा पुन्हा स्वयंपाकघरात आणा…कारण हे फक्त भांडे नाही, आरोग्याची गरज आहे!’ असा संदेश तज्ज्ञांनी दिला.

दरवर्षी १३ फेब्रुवारीला जागतिक ॲनिमिया दिन साजरा केला जातो. शरीरात रक्ताभिसरण करणाऱ्या हिमोग्लोबिनमध्ये घट झाल्यास ‘ॲनिमिया’ हा आजार उद्भवतो. पौष्टिक आहाराचा अभाव, मासिक पाळीतील रक्तस्त्राव आणि गर्भधारणेदरम्यान शरीराला वाढलेली लोहाची गरज पूर्ण न झाल्यास हा आजार बळावतो. ग्रामीण भागात ही समस्या गंभीर आहे.

३ हजार ५८१ गरोदर मातांना ॲनिमियाघाटीत २०२५ मध्ये उच्च जोखीम प्रसूतींमध्ये ॲनिमियाची तब्बल ३ हजार ५८१ प्रकरणे नोंदविण्यात आली. अक्षरश: ०.५ ‘एचबी’ असलेल्या महिलाही घाटीत येत असल्याची चिंता डाॅक्टरांनी व्यक्त केली.

‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ मोहिमेतील आकडेवारीजिल्हा - गर्भवती महिला- मध्यम ॲनिमिया (एचबी ७.१-१०.९) - टक्केवारी - गंभीर ॲनिमिया (एचबी ७ पेक्षा कमी) - टक्केवारीछत्रपती संभाजीनगर - ३४,३०६ - २९,३३७ - ८६ टक्के - १,७४८ - ५ टक्के

ॲनिमियाचे कारण?शरीरात लोह, व्हिटॅमिन बी-१२ आणि फॉलिक ॲसिड या पोषक तत्त्वांची कमतरता, चुकीच्या आहारपद्धती, जंक फूडचे सेवन आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात अभाव यामुळे ही समस्या उद्भवते. थकवा, हलकी चक्कर, बारीक ताप, श्वास घेण्यास त्रास, त्वचा फिकट पडणे, केस गळणे, ही ॲनिमियाची लक्षणे आहेत.

मनाने टाॅनिक नकोडाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय दुकानातून कोणतेही आयर्न टाॅनिक आणू नये. आहारात लोहयुक्त अन्नपदार्थांचा समावेश करावा. स्वयंपाकासाठी लोखंडी कढई किंवा तवा वापरल्याने अन्नामध्ये नैसर्गिकरीत्या लोहाचे प्रमाण वाढते.- डाॅ. श्रुती तोष्णीवाल, रक्तविकारतज्ज्ञ

महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष‘एचबी’ हे ११ पेक्षा कमी नसावे. त्यापेक्षा ‘एचबी’ कमी असेल तर ॲनिमिया असतो. ‘एचबी’ ५ ते ७ पर्यंत घसरलेल्या महिलांची घाटीत प्रसूती होते. इतके ‘एचबी’ कमी होईपर्यंत महिलांच्या आरोग्याकडे लक्ष दिले जात नाही. आहारात लोहयुक्त अन्नपदार्थांचा समावेश करावा.- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख, घाटी

लोखंडी कढई-तव्याचा फायदाअन्नपदार्थ तयार करण्यासाठी लोखंडी कढई-तव्याचा वापर करावा. त्यातून नैसर्गिकरीत्या लोह मिळून हिमोग्लोबिन वाढते. ॲनिमियामुक्त भारत योजनेंतर्गत आयर्न आणि फाॅलिक ॲसिडच्या गोळ्या दिल्या जातात.- डाॅ. कांचन वानेरे, आरोग्य उपसंचालक

English
हिंदी सारांश
Web Title : Iron Pans Vanishing, Anemia Risk Rising: Experts Urge Return!

Web Summary : The decline in iron pan usage increases anemia risk. Experts recommend using iron cookware to boost iron intake naturally, preventing deficiency and promoting health, especially for women.
टॅग्स :foodअन्नchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर