मुख्याध्यापकाची आत्महत्या
By Admin | Updated: August 9, 2014 00:30 IST2014-08-09T00:10:09+5:302014-08-09T00:30:01+5:30
गुन्हा दाखल

मुख्याध्यापकाची आत्महत्या
परभणी: परळी येथील वैद्यनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हाद जोगदंड यांच्या आत्महत्या प्रकरणात पत्नीने दिेलेल्या फिर्यादीवरुन परळी येथील १५ जणांविरुद्ध संगनमत करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरुन अॅट्रासिटी कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
मयताची पत्नी स्वाती प्रल्हाद जोगदंड (रा. समतानगर, परळी) यांचे पती तथा वैद्यनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हाद जोगदंड यांनी काही दिवसांपूर्वी तालुक्यातील करम शिवारात केलेल्या आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांनी सोनपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन माझे पती हे अनुसूचित जातीचे असून आरोपींनी संगनमत करुन जातीवाचक शिवीगाळ करुन त्रास दिला. तसेच माझ्या पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली. आरोपी पी. एस. घाडगे, मुन्ना महाजन, गजानन महाजन, नेताजी देशमुख, हनुमंत डोंकलवार, जे. व्ही. गाडे, एस. एल. देशमुख, सुभाष देशमुख, रामराजे देशमुख, एस. टी. आंधळे, के. के. ढाकणे, एस.जी. साखरे, ए. जी. बेग, पी. आर.राठोड, एम. पी. मोदी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी जी. एम. जटाळे, सपोनि. गाडेवाड हे करीत आहेत.(वार्ताहर)
पोलिस क्रीडा स्पर्धा
परभणी: येथील पोलिस मुख्यालयात शनिवारी सायंकाळी ५ वाजता पोलिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी एस. पी.सिंह यांच्या हस्ते होत आहे. या प्रसंगी पोलिस अधीक्षक अनंत रोकडे, अप्पर अधीक्षक नियती ठाकर यांची प्रमुख उपस्थिती राहील.(प्रतिनिधी)