पोलीस होण्याआधीच तो झाला आरोपी

By Admin | Updated: June 28, 2014 01:19 IST2014-06-28T01:02:07+5:302014-06-28T01:19:48+5:30

औरंगाबाद : पोलीस भरतीसाठी सादर केलेल्या कागदपत्रात खाडाखोड करून बनवाबनवी करणाऱ्या एका तरुणाला लॉकअपमध्ये जावे लागले.

He was the accused before the police came | पोलीस होण्याआधीच तो झाला आरोपी

पोलीस होण्याआधीच तो झाला आरोपी

औरंगाबाद : पोलीस भरतीसाठी सादर केलेल्या कागदपत्रात खाडाखोड करून बनवाबनवी करणाऱ्या एका तरुणाला लॉकअपमध्ये जावे लागले. त्याच्या विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद वसंता घुबे (२३, रा. देऊळगाव, ता. चिखली, जि. बुलडाणा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी शरद हा शहर पोलीस आयुक्तालयातर्फे घेण्यात येत असलेल्या पोलीस भरतीसाठी आला होता. त्याने भरती अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या कागदपत्रांपैकी नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्राच्या तारखेत खाडाखोड केल्याचे उघड झाले. नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्राची मुदत संपलेली असताना त्याने त्यातील महिना हाताने बदलला. महिना बदलेले प्रमाणपत्र त्याने पोलीस भरतीसाठी सादर केले. वरिष्ठ पोलीस अधिकारी कागदपत्रांची पडताळणी करीत होते, त्यावेळी त्यांच्या नजरेतून हे प्रमाणपत्र सुटले नाही. त्यांनी त्या प्रमाणपत्राची बारकाईने तपासणी केली असता आरोपीने चक्क पोलिसांनाच फसविण्याचा प्रयत्न केला.
पोलीस होण्यासाठीच गृहखात्याची फसवणूक करणाऱ्या त्या भामट्या तरुणाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या विरोधात विष्णू राजू खंदारे यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यास अटक करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोहेकॉ शेख करीत आहेत.

Web Title: He was the accused before the police came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.