शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

तो खोटे बोलतोय; माझ्यावर अत्याचार करणारा महेबूब शेख राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा प्रदेक्षाध्यक्षच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 17:56 IST

Rape case in Aurangabad : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख (रा. शिरुर, जि. बीड)यांच्याविरूध्द सिडको पोलीस ठाण्यात शिक्षिकेच्या तक्रारी वरुन बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा २६ डिसेंबर रोजी दाखल झाला आहे.

ठळक मुद्देमहेबूब शेख हा तो मी नव्हेच असे खोटे बोलत असल्याचे पिडितेने एका व्हिडीओमधून स्पष्ट केले. महेबूब शेख यांचा जबाब पोलिसांकडून नोंदविण्यात येणारपोलिसांकडून महेबूब शेख यास हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावली जाऊ शकते.

औरंगाबाद: आपल्यावर अत्याचार करणारा महेबूब शेख दुसरा तिसरा कोणी नसून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा प्रदेश अध्यक्षच आहे. आरोपी महेबूब शेख हा तो मी नव्हेच असे खोटे बोलत असल्याचे पिडितेने आज एका व्हिडीओमधून स्पष्ट केले. दरम्यान, पोलीस मेहबूब शेख यांना जबाबासाठी बोलवणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख (रा. शिरुर, जि. बीड)यांच्याविरूध्द सिडको पोलीस ठाण्यात शिक्षिकेच्या तक्रारी वरुन बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा २६ डिसेंबर रोजी दाखल झाला. या गुंह्याचा तपास पोलीस उपायुक्त दिपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ करीत आहेत. त्यांच्या मदतीसाठी फौजदार दर्जाच्या अधिकाऱ्यांची तीन पथके या गुंह्याचा तपास करीत आहेत. गुंह्याचे स्वरूप आणि आरोपी राजकीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. भाजपा महिला मोर्चाने गत सप्ताहात याप्रकरणातील आरोपी महेबूब शेख याला अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. शिवाय प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या घटनेत पोलीस आरोपीला वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आरोपी महेबूब शेख यांनी मुंबई पक्ष कार्यालयांत पत्रकार परिषद घेऊन खुलासा करतांना त्यांच्याविरूध्द खोटी तक्रार नोंदविण्यात आली. आपल्याविरुद्ध तक्रार करणाऱ्या महिलेला ओळखत नाही, कधी भेटलो नसल्याचा दावा शेख यांनी केला होता. दरम्यान, या प्रकरणातील पिडीता हिने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत दिलेला राहण्याचा पत्ता आणि आधारकार्डवरील पत्ता यात तफावत असल्याचे समोर आले.

व्हिडीओ झाला व्हायरल या पार्श्वभूमीवर पिडीतेने आज एक व्हिडिओ जारी केला. यात तिच्यावर अत्याचार करणारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख हाच असल्याचे स्पष्ट केले. शिवाय मेहबूब शेख खोटे बोलत असल्याचा दावा तिने केला आहे. मी उच्च शिक्षित आहे. यापुढे आपल्याला जे काय बोलायचे ते न्यायालयासमोर बोलेन . पोलिसांना काही सांगणार नाही असेही तिने व्हिडिओ मधून स्पष्ट केले.

महेबूब शेख यास पोलीस जबाबासाठी बोलावणारबलात्काराचा आरोप असलेले राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी याविषयी पत्रकार परिषद घेऊन तक्रारीत नमूद तारखेला ते औरंगाबाद शहरात नव्हते असे सांगून आपल्याविरुध्द तक्रार देणाऱ्या महिलेला ओळखत नसल्याचे म्हटले. असे असले तरी महेबूब शेख यांचा जबाब पोलिसांकडून नोंदविण्यात येणार आहे. या करीता लवकरच पोलिसांकडून महेबूब शेख यास हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावली जाऊ शकते. मात्र कधी त्यांना बोलावणार याविषयी मात्र अधिक माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.

काय आहे प्रकरण ?राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख (रा. शिरूर, जि. बीड) यांच्याविरुद्ध २९ वर्षीय शिक्षिका तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन सिडको पोलीस ठाण्यात २६ डिसेंबर रोजी बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला. मुंबईत शिक्षक पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने जवळीक साधून कारमध्ये १४ नोव्हेंबर रोजी रात्री हा अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले होते. आरोपी हा सत्ताधारी राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे अशा गंभीर स्वरुपाच्या गुंह्यातील आरोपीप्रमाणे तातडीने अटक न करता गुंह्याचा तपास सुरू केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसNCPराष्ट्रवादी काँग्रेस