चोरी करायला आला अन कपडे घालून गेला
By Admin | Updated: January 3, 2016 23:56 IST2016-01-03T23:27:33+5:302016-01-03T23:56:46+5:30
जालना : चोरीच्या उद्देशाने चोरट्याने दुकान फोडले खरे मात्र, हाती काहीच न लागल्याने चक्क अंगावरील जुने कपडे टाकून नवीन कपडे घालून गेल्याचा

चोरी करायला आला अन कपडे घालून गेला
जालना : चोरीच्या उद्देशाने चोरट्याने दुकान फोडले खरे मात्र, हाती काहीच न लागल्याने चक्क अंगावरील जुने कपडे टाकून नवीन कपडे घालून गेल्याचा अजब प्रकार रविवारी पहाटे घडला. मात्र, त्याचवेळी ही बाब वॉचमनच्या लक्षात आल्याने त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
शहरातील एम. जी. रोडवर जयमातादी रेडीमेड कापड दुकान आहे. शनिवारी रात्री दुकान बंद करून दुकानमालक घरी गेले. मध्यरात्रीनंतर चोरट्याने शेजारील बोळीतून दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. तेथे केवळ हजार रुपयाची चिल्लर होती. हाती काही लागत नसल्याचे लक्षात येताच दुकानातील कपडे चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी तो पकडला गेला. (प्रतिनिधी)