सेलू येथे पाच दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:39 IST2017-09-15T00:39:27+5:302017-09-15T00:39:27+5:30
शहरातील मोंढा परिसरातील पाच दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी तीस हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती़

सेलू येथे पाच दुकाने फोडली
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : शहरातील मोंढा परिसरातील पाच दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी तीस हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती़
सेलू शहरात चोरट्यांनी बुधवारी रात्री धुमाकुळ घातला़ मोढा परिसरातील पाच दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली़ मोंढा भागातील नरेश तुळशीराम घोडके यांच्या मेडीकल दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आतील पैशाची पेटी व त्यातील रोख सात हजार लांबविले़ त्यानंतर नानक हेमचंद कुंदनानी यांच्या सिमरण किराणा दुकानाकडे मोर्चा वळविला़
कुंदनानी यांच्या दुकानाचे शटर तोडून आतील रोख सोळा हजार रूपये लांबविले़ त्यानंतर बालासाहेब अप्पा सरकाळे यांचे तेलाचे दुकान फोडून रोख सात हजार व इतर साहित्य लांबविले़ तर याच परिसरातील गोविंद तेल भंडार व श्याम तेल भंडार या दुकानाचे केवळ कुलुप तोडल़े़ मात्र आतील सामान गेले नाही़ याप्रकरणी नरेश घोडके यांनी तक्रार दिली़ यावरून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती़