कतरिनाच्या बहिणीला पाहिलेत का?

By | Updated: December 8, 2020 04:00 IST2020-12-08T04:00:13+5:302020-12-08T04:00:13+5:30

उर्वशी रौतेला सोशल मीडियावर सुपर ॲक्टिव्ह राहते आणि सतत फॅन्ससाठी खास फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच उर्वशीने ...

Have you seen Katrina's sister? | कतरिनाच्या बहिणीला पाहिलेत का?

कतरिनाच्या बहिणीला पाहिलेत का?

उर्वशी रौतेला सोशल मीडियावर सुपर ॲक्टिव्ह राहते आणि सतत फॅन्ससाठी खास फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच उर्वशीने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये उर्वशी वेडंवाकडं तोंड करत पान खाताना दिसत आहे. यातही ती खूप ग्लॅमरस दिसत आहे. या व्हिडिओत उर्वशी रौतेलाने महानायक अमिताभ बच्चन यांना टॅग केलंय. बिग बींना टॅग करत उर्वशीने लिहिले की ‘बनारसी पान स्पेशल खाणार का जी?’ या व्हिडिओतील उर्वशीचा वेगळा अंदाज तिच्या फॅन्सना चांगलाच आवडला आहे. उर्वशी यात त्याचप्रमाणे तोंड करत आहे. ज्याप्रमाणे अमिताभ बच्चन हे डॉन सिनेमातील ‘खइके पान बनारसवाला’ गाण्यात केलं होतं.

कतरिनाच्या बहिणीला पाहिलेत का?

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री असलेल्या कतरिना कैफची बहीण इसाबेल बहिणीच्याच पावलावर पाऊल ठेवण्यास सज्ज आहे. इसाबेल लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. इसाबेलनं आपल्या इन्स्टाग्रामवर अनेक फोटो पोस्ट केले आहेत. यामधील तिचा अंदाज पाहून चाहते फिदा झाले आहेत. फॅशन सेन्स, उत्तम अभिनयशैली आणि चेहऱ्यावरील गोड हास्यामुळे इसाबेलने अनेकांच्या मनात घर केलं आहे. इसाबेलचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिने शेअर केलेले सर्व फोटो व्हायरल होत असल्याने ती कायम चर्चेत राहत आहे. सलमान खान इसाबेलला चित्रपटात लाँच करणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Have you seen Katrina's sister?