शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

तिजोरी फोडण्याच्या प्रयत्नाची ‘हॅटट्रीक’

By admin | Updated: March 4, 2015 00:24 IST

कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी सोमवारी रात्री केला.

कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी सोमवारी रात्री केला. हा प्रयत्न असफल झाल्याने ७ लाखांची रक्कम चोरी जाण्यापासून वाचली मात्र चोरट्यांनी जाताना बँकेतील दोन संगणक व इतर साहित्य चोरुन नेले. विशेष म्हणजे, यापूर्वी दोन वेळा बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न झाला होता. चोरीचा प्रयत्न पूर्वी होऊनही बँक प्रशासनाने कोणतीही उपाय योजना केली नसल्याचे पोलिसांच्या तपासणी दरम्यान समोर आले. गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. सोमवारी रात्री बँकेच्या शटरचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहायाने तोडून आत प्रवेश केला. तेच गॅस कटर बँकेमध्ये नेले. तेथील तिजोरी गॅस कटरच्या साहायाने फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तिजोरी तुटली नाही. त्यामुळे सुदैवाने, तिजोरीमधील सात लाख वाचले. चोरट्यांनी रिकाम्या हाताने न जाता बँकेतील दोन संगणक व साहित्य चोरुन नेले. याची माहिती मंगळवारी सकाळी चकलंबा पोलिसांना देण्यात आली. पंचनाम्यापूर्वी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तसेच पोलिसांची वस्तुवरील फिंगरप्रिंट घेतले आहेत. या प्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय दिलीप तेजनकर करीत आहेत. दरम्यान, पंधरा दिवसापूर्वीच असाच प्रयत्न झाला होता. चोरट्यांचे पोलिसांना आव्हानतिच बँक, तोच प्रकार, तशीच पद्धत. असा प्राथमीक संशय पोलिसांना येत आहे. हे काम एकाच टोळीद्वारे केले जात आहे काय ?असा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे. पहिल्या दोन चोऱ्यांचा तपास लागला नसल्याने चोरट्यांना एका प्रकारे अभय मिळाले आहे. त्यामुळेच तिसऱ्यांदा चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. चोरट्यांनी पोलिसांना जणू आव्हानच दिले आहे. किरकोळ चोरी असल्याचे माणून पोलीस तपासाला दिरंगाई करत आहे काय ? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला .