शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पाकिस्तानच्या तुरुंगातून १८ वर्षांनंतर महाराष्ट्रात परतलेल्या हसीना बेगम यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 5:34 PM

hasina begum : पाकिस्तानात तब्बल १८ वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर २६ जानेवारी रोजी भारतात परतलेल्या ६५ वर्षीय हसीना बेगम यांचं निधन

पाकिस्तानात तब्बल १८ वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर २६ जानेवारी रोजी भारतात परतलेल्या ६५ वर्षीय हसीना बेगम (hasina begum) यांचं निधन झालं आहे. त्या औरंगाबादच्या रशदपुरा येथील रहीवासी होत्या. वृद्धापकाळाने त्याचं आज निधन झालं आहे. त्यांची नमाजे जनजा रशीदपुरा येथील मोहंमदीया मस्जिद मध्ये दुपारी नमाज जोहरमध्ये अदा करण्यात आली. मायदेशी परतल्यानंतर अवघ्या १५ दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या जाण्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. मायभूमीत अखेरचा श्वास घेवून त्यांनी जगातून निरोप घेतला. औरंगाबाद येथील पीरगैब कब्रस्तान येथे त्यांचा दफनविधी करण्यात आला. त्यांना वारस नसल्याने नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी दफनविधी केले. (hasina begum who returned from pakistan after 18 years died in aurangabad)

पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी औरंगाबादमधील हसीना बेगम १८ वर्षांपूर्वी पाकिस्तानामध्ये गेल्या होत्या. या दरम्यान त्यांचा पासपोर्ट हरवल्याने त्यांना तब्बल १८ वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये काढावे लागले. औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तान न्यायालयात केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांची सुटका झाली आहे. प्रजासत्ताक दिनी हसीना बेगम औरंगाबाद येथे परतल्या होत्या. 

नेमकं काय घडलं होतं?हसीना बेगम या औरंगाबादमधील रशिदपुरा परिसरातील आहेत. त्यांचा निकाह उत्तर प्रदेशच्या सहारनपूरचा रहिवासी असलेल्या दिलशाद अहमदसोबत झाला होता. १८ वर्षांपूर्वी त्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासही पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या. या दरम्यान, त्यांचा पासपोर्ट लाहोर येथे हरवला. यामुळे त्यांना पाकिस्तानमध्ये कैद करण्यात आले. आपण निर्दोष असल्याचं हसीना बेगम यांनी पाकिस्तानच्या कोर्टात सांगितलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मागितली. हसीना बेगम यांच्या नावावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत एक अधिकृत घर आहे, अशी माहिती औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तानला पाठवली. त्यानंतर पाकिस्तानने मागील आठवड्यात त्यांची सुटका केली आणि त्यांना भारताच्या अधिकाऱ्यांकडे सोपवलं. 

१८ वर्षानंतर औरंगाबादमध्ये परतल्यानंतर प्लॉट हडपतब्बल १८ वर्षानंतर हसीना बेगम भारतात परतल्या. मात्र, शहरात परतल्यानंतर ज्या प्लॉटच्या कागदपत्रांच्या आधारे त्यांची सुटका झाली तोच प्लॉट भूमाफियांनी बळकावला असल्याचे उघडकीस आले होते. आपला प्लॉट परत मिळावा यासाठी हसीना बेगम पोलीस आयुक्तांची भेट देखील घेणार होते. हसीना बेगम यांनी १८ जुलै २००० साली शहरातील रशिद्पुरा येथे एक प्लॉट विकत घेतला होता. याची रजिस्ट्री करण्यात आली होती. यानंतर त्यांचे लग्न झाले आणि त्या उत्तरप्रदेशातील सहारणपूर येथील शेख दिलशाद अहमद यांच्यासोबत झाले. त्यांना मूलबाळ नाही. २००४ साली त्या नातेवाइकांना भेटण्यासाठी रेल्वेने पाकिस्तानला गेल्या होत्या. तेव्हा तेथे त्यांच्या नातेवाइकांची भेट झाली नाही. मात्र, त्यांचा पासपोर्ट हरवला. तेव्हा संशयित म्हणून त्यांना तेथील पोलिसांनी ताब्यात घेतले आणि जेलमध्ये टाकले. तेव्हापासून त्या मायदेशी परत येण्यासाठी प्रयत्न करीत होत्या.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPakistanपाकिस्तान