शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

शुभ वर्तमान ! मराठवाड्याच्या भूजल पातळीत ३ मीटरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 14:57 IST

लातुरात सर्वाधिक, तर हिंगोलीत सर्वांत कमी वाढ

औरंगाबाद : ‘टँकरवाडा’ ही ओळख मिटवत सलग दुसऱ्या वर्षी मराठवाड्याच्या भूजल पातळीत २.७९ मीटरने वाढ झाली ( Groundwater level in Marathwada ) आहे. यंदा पावसाची मराठवाड्यावर कृपादृष्टी राहिली. यामुळे दुष्काळाची सावट मिटले आहे.

मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात सर्वाधिक भूजल पातळी ४.३७ मीटरने वाढली आहे. सर्वांत कमी १.१६ मीटरची वाढ हिंगोली जिल्ह्यात नोंदविण्यात आली आहे. भूजल पातळी ३.९४ मीटरने वाढून परभणी दुसऱ्या स्थानावर आहे, तर २.११ मीटरने भूजल पातळी वाढून औरंगाबाद ६ व्या स्थानावर येऊन पोहोचला आहे. सप्टेंबरमध्ये सरासरी पाणीपातळी २.०३ मीटर एवढी होती. मराठवाड्यात १११२.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी या कालावधीत सरासरी ६७९.५ मिमी पाऊस होतो. परतीच्या पावसाने काही जिल्ह्यांत ढगफुटीसारखा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, आता रब्बी पिकांना या भूजल पातळी वाढल्याचा मोठा फायदा होणार आहे. हवामान पोषक राहिले तर गहू, ज्वारी अन्य पिके जोमात येतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तसेच टँकरवर अवलंबून राहणाऱ्या गावांची संख्या तुरळक राहील.

सोनपेठ तालुक्यात विक्रमी वाढभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यातील ८७५ निरीक्षण विहिरीच्या पाणीपातळीची तपासणी केली. ७६ तालुक्यांतील या निरीक्षण विहिरी आहेत. यात नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे ०.२७ मीटरने भूजल पातळी वाढली. ही मराठवाड्यातील सर्वांत कमी वाढ आहे, तर सर्वाधिक परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील भूजल पातळीत ७.३५ मीटर एवढी विक्रमी वाढ झाली आहे. भूजल पातळीची दुसरी पाहणी फेब्रुवारीत होणार आहे. त्यावेळी उन्हाळ्यातील परिस्थितीचा अंदाज येईल.बी. एस. मेश्राम, उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा

जिल्हा            भूजल पातळी वाढ (प्रति मीटर)औरंगाबाद २.११जालना २.५०परभणी ३.९४हिंगोली १.१६नांदेड १.२१लातूर ४.३७उस्मानाबाद ३.८५बीड ३.१६

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाWaterपाणी