शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
3
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
4
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
6
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
7
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
8
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
9
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
10
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
11
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
12
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
13
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
14
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
15
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
16
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
17
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
18
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
19
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
20
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?

छत्रपती संभाजीनगरात भरदार मिशीवाला हनुमान, तुम्ही घेतले का दर्शन ?

By प्रशांत तेलवाडकर | Published: April 25, 2024 4:26 PM

मिशीवाला मारुती असे वाचले की, अधिक माहिती जाणून घेण्याची तुमची उत्सुकता वाढली असेल...

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही आतापर्यंत हनुमानाची अनेक मंदिरे पाहिले असतील... पण त्यात मिशी-दाढी असलेली हनुमान मूर्ती दुर्मिळच. आपल्या शहरात बजरंगबलीची २१४ मंदिरे आहेत. विविध रूपे व आकारातील मूर्ती आहेत, पण त्यात एकच मंदिर असे आहे, जिथे मिशीवाला हनुमान आहे.

मिशीवाला मारुती असे वाचले की, अधिक माहिती जाणून घेण्याची तुमची उत्सुकता वाढली असेल... असे अनेक भाविक असतील, ज्यांनी या मारुतीचे दर्शन घेतले असेल.

भरदार मिशी हेच वैशिष्ट्यकैलासनगरातील स्मशानभूमीच्या उत्तर बाजूस एक मंदिर आहे. या मंदिरालाच स्मशान हनुमान मंदिर या नावानेच ओळखले जाते. स्मशान हनुमानाच्या मूर्तीलाच भरदार काळी गडद मिशी आहे. काही भाविकांच्या मते अशी पिळदार गडद मिशी राखलेली शहरातच नव्हे, तर महाराष्ट्रातील एकमेव ही हनुमानाची मूर्ती असावी.

काळ्या पाषाणातील शेंदूरवर्णीय मूर्तीमूर्ती काळ्या पाषाणातील आहे. त्यावर शेंदराचा लेप चढविण्यात आला आहे. रूद्र स्वरुपातील ही मूर्ती वीर हनुमानाची जाणीव करून देते. वीरासनात बसलेला हनुमानाचा एक गुडघा जमिनीला टेकवलेला व दुसरा उंच केलेला आहे. एका हातात गदा आहे. पटकन उठता येईल अशा स्थितीत ही मूर्ती आहे. हनुमानाचे डोळेही मोठे असून उग्र रूप धारण केले आहे.

दिवसभरात दिसतात तीन रूपेभाविकांची अशी श्रद्धा आहे की, या हनुमानाची दिवसभरात तीन रूपे पाहण्यास मिळतात. सकाळी बालरूप, दुपारी तरुण व रात्री ज्येष्ठाच्या रूपात मूर्ती पाहण्यास मिळते. मंदिराच्या विश्वस्तांनी सांगितले की, या मूर्तीची स्थापना श्री रामदास स्वामी यांनी केली आहे. मात्र, यासंदर्भातील काही पुरावे नाहीत. या मूर्तीला मिशा का आहेत, याची काही आख्यायिकाही कोणाला माहीत नाही. मात्र, गाभाऱ्यावरून हेमाडपंती बांधकाम असलेले ३५० वर्षांपेक्षा जुने हे मंदिर असल्याचा अंदाज मंदिरांचे अभ्यासक प्रा. अनिल मुंगीकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंतीAurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक